चिंताजनक! मनपाच्या अहवालानुसार २४ दिवस ठरले घातक; कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

corona3.png
corona3.png
Updated on

नाशिक : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत सहा महिन्यांत २४ दिवस कोरोनाच्या दृष्टीने घातवार ठरले. या काळात शहरात कोरोनाबाधितांची संख्या तब्बल दुपटीने वाढली. १५ जूनपर्यंत शंभरच्या पटीत रुग्ण आढळत होते. त्यानंतर ते पाचशे व आता हजारच्या पटीत आढळून येत असल्याने सप्टेंबरअखेर रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या पुढे जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मनपाच्या अहवालानुसार २४ दिवस ठरले घातक 
 
जूनच्या मध्यापर्यंत नियंत्रणात असलेला प्रादुर्भाव त्यानंतर मात्र सातत्याने वाढल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट होते. १८ जूनला शहरात एक हजार २९४ कोरोनाबाधित आढळले. त्यानंतरच्या दहा दिवसांनी एक हजार ८१७, तर २८ जूननंतर सहा दिवसांनी २ जुलैला दोन हजार ३९५ रुग्ण आढळले. हे प्रमाण तीस टक्क्यांनी वाढले. त्यानंतरच्या आठ दिवसांनी म्हणजे ८ जुलैला तीन हजार २५७ कोरोनाग्रस्त झाले. त्यात २ जुलैच्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी रुग्ण वाढले. १२ जुलैला चार हजार ९५, तर त्यानंतरच्या आठ दिवसांनी पाच हजार २७३ रुग्ण आढळल्याने दर सहा दिवसांनी सरासरी चाळीस टक्के रुग्णांची वाढ होत गेली. 

अनलॉक, तपासणीनंतर वाढले रुग्ण 

२२ जुलैला शहरात सहा हजार ४१६ रुग्ण होते. त्यानंतरच्या सहा दिवसांनी सात हजार ९१९ पॉझिटिव्ह आढळले. साधारण दीड हजारांनी रुग्ण वाढले. २२ जुलैनंतर शहरात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या आढळून आली. याच काळात राज्य शासनाने अनलॉक धोरण जाहीर केल्याने बाजार पूर्णपणे खुले झाले. त्याचा परिणाम कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यात झाल्याचे दिसून आले. 

ऑगस्टमध्ये वाढली रुग्णसंख्या 

१ ऑगस्टला शहरात नऊ हजार ८०८ रुग्ण होते. ८ ऑगस्टला १२ हजार ५०४ रुग्ण झाले. या आठ दिवसांत दोन हजार ६९६ रुग्ण वाढले. त्यानंतर १९ ऑगस्टला १८ हजार ३० रुग्णसंख्या झाली. आठ दिवसांत पाच हजार ५२६ रुग्णांची भर पडली. २५ ऑगस्टला २० हजार ८१८ कोरोनाबाधित आढळले. त्यानंतर २ सप्टेंबरला २६ हजार ६७१ रुग्णसंख्या झाली. २५ ऑगस्टनंतर आठ दिवसांत पाच हजार ८५३ रुग्णसंख्या वाढली. ९ एप्रिलला ३२ हजार ८९३ रुग्णसंख्या झाली. २ सप्टेंबरच्या तुलनेत सहा हजार २२२ ने रुग्णसंख्या वाढली. 

जुलै व ऑगस्टमध्ये महापालिकेतर्फे शहरभर ‘मिशन झीरो नाशिक’ अंतर्गत रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट वाढविल्या. त्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. मात्र, पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असले तरी त्यांच्यावर उपचार करून कोरोनाची साखळी खंडित करण्यास मदत झाली. - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका  

संपादन - किशोरी वाघ


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com