नवनियुक्त आयुक्त दीपक पांडेंपुढे आव्हान! लाच स्वीकारताना पोलीस हवालदारावर एंटी करप्शनची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

आयुक्तालय हद्दीत पोलीस दलाची प्रतिमा अधिकाधिक सुधारण्यासाठी व कारभार पारदर्शक करण्याकरिता नवनियुक्त आयुक्त दीपक पांडे यांना अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच या प्रकार घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रजेवर असताना लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी गेले होते. पोलीस ठाण्यांमध्ये चालणारे चिरीमिरीचे गुपचूप व्यवहार सर्वश्रुत आहे; मात्र आयुक्तालय हद्दीत पोलीस दलाची प्रतिमा अधिकाधिक सुधारण्यासाठी व कारभार पारदर्शक करण्याकरिता नवनियुक्त आयुक्त दीपक पांडे यांना अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच या प्रकार घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

असा घडला प्रकार
एका ३२ वर्षीय भंगार व्यावसायिकाला पोलीस ठाणे हद्दीत दुकान सुरू ठेवण्यासाठी मल्ले याने तक्रारदार व्यापाऱ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. बोलणी झाल्यानुसार गुरुवारी मल्ले याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उपअधीक्षक सुनील पाटील, सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक किरण रासकर, राजेंद्र गिते, शरद हेंबाडे आदींनी शिताफीने मल्ले यास रंगेहात ताब्यात घेतले. मल्लेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

लाचेची रक्कम स्वीकारताना अटक
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगारमालाचे दुकान सुरू करण्यासाठी तक्रारदार व्यावसायिकाकडे पाच हजारांची मागणी करत लाचेची तेवढी रक्कम स्वीकारताना या पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले संशयित हवालदार भास्कर दामोदर मल्ले (५२) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गुरुवारी (दि.१०) अटक केली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti-corruption action against police constable for accepting bribe nashik marathi news