esakal | आश्चर्यंच! चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती
sakal

बोलून बातमी शोधा

corona second patient.jpg

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे चांगलेच कंबरडे मोडले असताना रुग्णांना पॉझिटिव्ह ठरविणारे अहवाल सदोष असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे रुग्णांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. चोवीस तासांत एकाच लॅबोरेटरीतील परस्परविसंगत आणि तितक्याच धक्कादायक अहवालामुळे रुग्णांची मात्र पाचावर धारण बसली आहे. दस्तुरखुद्द रुग्णानेच ‘सकाळ’शी बोलताना आपबीती कथन केली. 

आश्चर्यंच! चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे चांगलेच कंबरडे मोडले असताना रुग्णांना पॉझिटिव्ह ठरविणारे अहवाल सदोष असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे रुग्णांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. चोवीस तासांत एकाच लॅबोरेटरीतील परस्परविसंगत आणि तितक्याच धक्कादायक अहवालामुळे रुग्णांची मात्र पाचावर धारण बसली आहे. दस्तुरखुद्द रुग्णानेच ‘सकाळ’शी बोलताना आपबीती कथन केली. 

रुग्णाने "सकाळला" सांगितली आपबिती

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सामान्य नागरिक हैराण असताना त्यांचे वैद्यकीय अहवाल निर्दोष येत नसल्याचे चित्र आहे. आदल्या दिवशी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णाचाच दुसऱ्या दिवशी चक्क निगेटिव्ह रिपोर्ट आला.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे चांगलेच कंबरडे मोडले असताना रुग्णांना पॉझिटिव्ह ठरविणारे अहवाल सदोष असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे रुग्णांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. शहरातील दातार कॅन्सर जेनेटिक्स या नामांकित पॅथॉलॉजीच्या अहवालात हे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांची चांगलीच तारांबळ उडाली. पाईइपलाइन रोड परिसरात राहणारे नारायण शेळके एका खासगी वाहनावर चालक असून, कोरोनाच्या संशयाने त्यांनी अंबड औद्योगिक वसाहतीतील नामांकित दातार कॅन्सर जेनेटिक्समध्ये ८ सप्टेंबरला तपासणी केली. त्या दिवशी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. त्यामुळे कुटुंबीयांची चांगलीच धांदल उडाली. त्यांच्या जवळच्या नातेवाईक- मित्रपरिवाराला धक्का बसला.

पॅथॉलॉजीचा तांत्रिक चूक झाल्याचा कबूलनामा 

खासगी रुग्णालयात उपचाराची ऐपत नसल्याने कुठल्या सरकारी रुग्णालयात ॲडमिट व्हायचे याची तयारी सुरू असतानाच, रात्रभर या कुटुंबाने जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल होण्याची तयारी सुरू असतानाच, त्याच पॅथॉलॉजीमधून दुसरा रिपोर्ट प्राप्त झाला, जो रिपोर्ट चक्क निगेटिव्ह होता. त्यामुळे या कुटुंबाचा आणखी गोंधळ उडाला. निगेटिव्ह असल्याचा आनंदही झाला. त्यामुळे खरा रिपोर्ट कोणता याची पॅथॉलॉजीकडे शहानिशा करण्यासाठी गेले. त्यावर पॅथॉलॉजीने तांत्रिक चूक झाल्याचे कबूल करून माफी मागितली. पण यानिमित्ताने दोन वेगवेगळ्या अहवालांमुळे कुटुंबाची मात्र चांगलीच फरपट झाली. 


माझा कोरोनाचा रिपोर्ट पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आला. या गोंधळामुळे मनस्ताप झाला. तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला. कोरोना पॉझिटिव्ह म्हटल्यावर काय बितते यांना कसे सांगणार? -नारायण शेळके, तक्रारदार, वाहनचालक 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ 


रोज आमच्याकडे अडीच हजार कोरोनाच्या तपासण्या होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यातून एखादी अशी घटना घडणे स्वाभाविक आहे; परंतु त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. ही तांत्रिक चूक होती हे आम्ही मान्य करतो. -राजन दातार, संचालक, दातार कॅन्सर जेनेटिक सेंटर, अंबड

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी