लॉकडाऊनमुळे घराघरातील हरवलेले संवाद लागलेय वाढू!..मात्र, मुलांपुढे प्रश्न 'कंटाळा आला, मी काय करू'?

corona effect.png
corona effect.png

नाशिक : (गिलाणे) कोरोना विषाणू (कोविड-19) या संसर्गजन्य साथीच्या आजारामुळे सध्या मुलांना अचानक सुट्या मिळाल्या आहेत. त्यातच पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षाही रद्द केल्याने लॉकडाउनमुळे घराबाहेर पडायचे नाही. यामुळे मुलांबरोबर पालकांनाही एक मोठा प्रश्‍न सतावतो आहे, तो म्हणजे, "आता मी काय करू'. दिवसभर मुलांना सतत लागणारी भूक, त्यांना येणारा कंटाळा, वेळ कसा घालवायचा, असा प्रश्‍न, यातून मार्ग कसा काढायचा यासाठी पालकवर्ग एकमेकांना मार्ग सुचवीत आहेत. मुलांच्या बुद्धीला चालना देणारे घरगुती खेळ कोणते असावेत याबाबतच्या चर्चांना सध्या सर्वत्र उधाण आले आहे. 

नात्यातील दोर अधिक घट्ट होतेय

मुलांना खायला काय द्यावे, त्यात वैविध्य कसे राखावे, खाण्याचे पदार्थ चविष्ट आणि तरीही पौष्टिक कसे असावेत, याबाबतही पालकांना बारकाईने विचार करावा लागत आहे. कमीत कमी घटक पदार्थ वापरून करता येऊ शकणाऱ्या "हेल्दी' आणि "होममेड' खाऊची यादी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना फॉरवर्ड करण्यात येत आहे. हे पदार्थ बनविताना मुलांचीही जमेल तितकी मदत घेतल्याने मजा येईल, वेळही जाईल आणि मुले आवडीने खातील, असे पालकांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे कुटुंबे संवादमय झाली आहेत. घराघरातील हरवलेले संवाद वाढू लागले आहेत. लॉकडाउन परिस्थितीमुळे नात्यातील दोर अधिक घट्ट होत आहेत. 

घरातील छोटे-मोठे निर्णय एकत्र बसून घेतले जाताय

आपापसांत प्रेम, माया, आपुलकी वाढीस लागली आहे. संवाद वाढल्याने घरातील छोटे-मोठे निर्णय एकत्र बसून घेतले जात आहेत. त्यामुळे नात्यात गोडवा, प्रेम, जिव्हाळा वाढत आहे. पालक आणि पाल्य यांना दिवसरात्र वेढलेल्या कामामुळे नात्याचे बंध कमकुवत झाले आहेत. परंतु आता कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम'मुळे तासन्‌तास आई आणि वडील दोघेही मुलांना व ज्येष्ठांना वेळ देत आहेत. मात्र खेळण्या-बागडण्याच्या दिवसांत सारखे घरी बसून राहणे मुलांना मुश्‍कील झाल्याचे चित्र आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com