#Coronafighters :"कोरोना'' विरुद्धच्या लढाईत उतरलेल्यांमध्ये 'त्या' करताय सेवाभावनेने शुश्रूषा!

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

जगभरात परवलीचा शब्द बनलेल्या "कोरोना'' विरुद्धच्या लढाईत उतरलेल्यांमध्ये आम्ही सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहोत, हे सांगताना "त्यांच्या' मनात चुकूनही गर्व किंवा अभिमानाची भावना दिसत नाही, तर त्याऐवजी दिसतो तो फक्त आणि फक्त सेवाभाव. अशा सेवाभावाने अहोरात्र शुश्रूषेसाठी स्वत:ला वाहून घेतल्यागत काम करताहेत विविध रुग्णालयांतील परिचारिका. त्यातही जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयांमधील परिचारिकांच्या सेवेचे मोल अधिक आहे.

नाशिक : जगभरात परवलीचा शब्द बनलेल्या "कोरोना'' विरुद्धच्या लढाईत उतरलेल्यांमध्ये आम्ही सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहोत, हे सांगताना "त्यांच्या' मनात चुकूनही गर्व किंवा अभिमानाची भावना दिसत नाही, तर त्याऐवजी दिसतो तो फक्त आणि फक्त सेवाभाव. अशा सेवाभावाने अहोरात्र शुश्रूषेसाठी स्वत:ला वाहून घेतल्यागत काम करताहेत विविध रुग्णालयांतील परिचारिका. त्यातही जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयांमधील परिचारिकांच्या सेवेचे मोल अधिक आहे.

त्यांना शुश्रूषा करण्यात धन्यता वाटतेय

खरेतर आजमितीस जगभरातील प्रत्येक जण सजग झालेला आहे. जो-तो स्वत:ची व आपल्या प्रियजनांची, कुटुंबीयांची काळजी घेतोय. अशा स्थितीत परिचारिकांनाही त्यांच्या घरून, कुटुंबातून काळजीचा सूर ऐकावयास, बघावयास मिळतोच. मात्र, सेवेचे व्रत घेतलेले असल्याने, तशाही परिस्थितीत न डगमगता त्यांना शुश्रूषा करण्यात धन्यता वाटतेय. जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात दिवसभरात किमान चार ते पाच जण तपासणी करून घेण्यासाठी येतात. अशा प्रत्येकाची योग्य ती काळजी घेऊन उपचार केले जात आहेत, ते याच भावनेतून. या कक्षात दहा परिचारिका अहोरात्र शुश्रूषेत गुंतल्या आहेत. त्यातील पाच विवाहित असून, घरची जबाबदारी सांभाळून या ठिकाणी कार्यरत आहेत. याबाबत विचारले असता, "आम्ही न डगमगता सेवेत आहोत' असे त्या आत्मविश्‍वासाने सांगतात. 

हेही वाचा >.'घबाड आलं हाती अन् कर्मानं केली माती'...मग काय चांगलीच झाली फजिती!

प्रत्येकाची आस्थेवाईकपणे करता विचारपूस

जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांकडून आमची काळजी घेण्यात येते. त्यामुळे कसलीही भीती वाटत नसल्याचे त्या आत्मविश्‍वासाने नमूद करतात. कक्षात येणारे नागरिक, प्रामुख्याने भीती काढून घेण्यासाठी तपासणी करून घेत असतात. अशा वेळी कक्षात जाण्याआधी परिचारिकांनाच त्यांची वैद्यकीयदृष्ट्या काळजी घ्यावी लागते. कॅप, गॉगल, शूज, हॅंडग्लोव्हज, कोट, मास्क असा संपूर्ण पोशाख परिधान करून त्या ही शुश्रूषा करतात. रुग्णालयात 24 तास उपस्थित राहून, कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यातून प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जाते. त्यामुळे, संशयितांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, यासाठीची मुख्य भूमिका परिचारिकाच बजावत आहेत. त्याच वेळी त्यांना स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याविषयीही सजग राहावेच लागतेय.  

हेही वाचा > #COVID19 : गर्दी नको..अन् नको तो कोरोना! लग्नाच्या गाठी बांधून आटोपला घरगुती विवाह सोहळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Fighters : Nurse working in the Corona Department at Civil Hospital nashik marathi news