अखेर केलाच इगतपुरीत कोरोनाने शिरकाव...एक पॉझिटिव्ह

corona-virus-getty.jpg
corona-virus-getty.jpg

नाशिक : (इगतपुरी) गेल्या दोन अडीच महिन्यांपासून कोरोना ससंर्गजन्यमुक्त असलेल्या इगतपुरी शहरात अखेर कोरोनाने शिरकाव केलाच...शनिवार (ता. 30) एक कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनचे धाबेच दणाणले. या पार्श्वभूमीवर सहा दिवस म्हणजेच गुरुवार (ता. 4) जुनपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

दुखणं राहीलं बाजूलाच अन् 

शहरातील टिकापुरी खालची पेठ येथील वयोवृद्ध 77 वर्षीय इसम यांना पोटाचा त्रास होत असल्याने मंगळवारी (ता. 26) रोजी त्यांना नाशिक येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने विविध प्रकारच्या तपासण्या केल्या असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. शनिवारी (ता. 30) त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समजताच त्यांना पुढील उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहीती समजताच तहसिलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, ग्रामिण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी स्वरुपा देवरे व नगरपरिषदेचे आरोग्य पथक यांनी तातडीने टिकापुरी खालची पेठ भागाची पहाणी करुन पन्नास मीटरपर्यंतच्या चारही बाजुने भाग सीलबंद केला.

कोरोना बाधीत रूग्णाच्या कुटुंबातील चार व्यक्तींना त्वरीत भावली येथील इंग्लिश मेडीयम निवासी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असुन व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने गुरुवार (ता. 4) जुनपर्यंत मेडीकल, दवाखाना, दुध आदी आत्यावश्यक सेवा वगळता जनता कर्फ्यू घोषीत केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com