धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

शेडनेटमधील शिमला मिरचीला पाणी देण्यासाठी सकाळी शेतमालक गेले असता धक्कादायक प्रकार घडला. शेडनेटचे दार उघडताच त्याचे झाले दर्शन अन् त्याला समोर बघून त्या शेतमालकाची भंबेरीच उडाली...शेडनेटचे दार बंद करत त्यांनी बाहेर धाव घेतली अन् नंतर...

नाशिक : वडगाव पिंगळा (सिन्नर) येथील शेडनेटमधील शिमला मिरचीला पाणी देण्यासाठी सकाळी शेतमालक गेले असता धक्कादायक प्रकार घडला. शेडनेटचे दार उघडताच त्याचे झाले दर्शन अन् त्याला समोर बघून त्या शेतमालकाची भंबेरीच उडाली...शेडनेटचे दार बंद करत त्यांनी बाहेर धाव घेतली अन् नंतर...

असा आहे प्रकार

माधवराव गंधास यांच्या घराला लागून असलेल्या आज (दि.२९) सकाळी शेडनेटमध्ये बिबट्या घुसल्याची घटना शुक्रवारी (ता.29) सकाळी घडली. अचानक बिबट्यासमोर आल्याने शेतकर्‍यासमोर भंबेरी उडाली. ही बाब वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. शेडनेटमधील शिमला मिरचीला पाणी देण्यासाठी सकाळी शेतमालक अरुण विंचू गेले असता अचानक बिबट्या त्यांच्या समोर आला. बिबट्या दिसताच त्यांची भितीने भंबेरी उडाली.

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव

त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शेडनेटच्या बाहेर धाव घेत दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील यांना शेडमध्ये बिबट्या घुसल्याची माहिती दिली. पोलीस पाटीलांनी तत्काळ सिन्नर येथील वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना शेडमध्ये बिबट्या घुसल्याची माहिती दिली. शेडनेटचे गेट उघडे राहिल्याने बिबट्या आत गेला असावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard, which had entered the shednet, suddenly appeared in front of the farmer nashik marathi news