पत्रकारांची होणार कोरोना तपासणी - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 22 April 2020

मुंबईतील पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेतर्फे कोरोनाची चाचणी घेतली. विविध माध्यमांत कार्यरत 167 पत्रकारांची गेल्या गुरुवारी कोरोना चाचणी झाली. त्यातील 53 पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्याच पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये फिल्डवर काम करणारे पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर यांच्यासाठी तातडीने विशेष तपासणी शिबिर घेऊन सर्वांची तपासणी करावी, अशा सूचना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांना दिल्या आहेत.

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राज्यातील जनतेला कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या मुंबईतील पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फिल्डवर काम करणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांचीही तातडीने तपासणी करण्यासाठी शिबिर घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहेत. मंगळवारी (ता. 21) भुजबळ यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तपासणी शिबिर घेण्यास सांगितले. 

तातडीने विशेष तपासणी शिबिर घेऊन तपासणी
मुंबईतील पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेतर्फे कोरोनाची चाचणी घेतली. विविध माध्यमांत कार्यरत 167 पत्रकारांची गेल्या गुरुवारी कोरोना चाचणी झाली. त्यातील 53 पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्याच पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये फिल्डवर काम करणारे पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर यांच्यासाठी तातडीने विशेष तपासणी शिबिर घेऊन सर्वांची तपासणी करावी, अशा सूचना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांना दिल्या आहेत.

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! शाळेला सुट्टया म्हणून तलावाकडे गेलेल्या चिमुरड्याची आली अशी बातमी..कुटुंबियांचा आक्रोश

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona investigation of journalists nashik marathi news