Coronaupdate : नाशिकचा कोरोना मृत्युदर दोन टक्के; तर बरे होण्याचा दर ८६.६४ टक्के

corona-test.jpg
corona-test.jpg

नाशिक : विभागात एक लाख ८१ हजार ८५५ रुग्णांपैकी एक लाख ५७ हजार ५७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यःस्थितीत २० हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी तीन हजार ६४९ (२ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.६४ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली. 

मंगळवारपर्यंत एक हजार ३३६ रुग्णांचा मृत्यू 

विभागातून मंगळवार (ता. २९)पर्यंत पाठविलेल्या पाच लाख ४१ हजार ७९७ रुग्णांच्या नमुन्यांपैकी एक लाख ८१ हजार ८५५ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांपैकी २८ हजार १७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वारंटाइन असून, एक हजार ९३९ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 
नाशिक जिल्ह्यात ७३ हजार ८८८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६४ हजार ९८१ बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.९५ टक्के आहे. मंगळवारपर्यंत एक हजार ३३६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

जळगाव जिल्ह्यात ८१.३३ टक्के बरे होण्याचे प्रमाण 

जळगाव जिल्ह्यात ४७ हजार ६४८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३८ हजार ७५३ रुग्ण बरे झाले आहेत. सात हजार ७२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३३ टक्के आहे. मंगळवारपर्यंत एक हजार १६६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

धुळ्यात ९०.६० टक्के बरे होण्याचे प्रमाण 

धुळे जिल्ह्यात मंगळवारपर्यंत १२ हजार २०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ११ हजार ६१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ७८६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६० टक्के आहे. मंगळवारपर्यंत ३६१ रुग्णांचा मृत्यू झाला. 

नंदुरबार जिल्ह्यात ८४३ रुग्णांवर उपचार सुरू 

नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारपर्यंत पाच हजार ४१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, चार हजार ४५८ रुग्ण बरे झाले आहेत. ८४३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, बरे होण्याचे प्रमाण ८२.२८ टक्के आहे. मंगळवारपर्यंत ११७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ४२ हजार ६९३ बाधितांपैकी ३८ हजार ३२० रुग्ण बरे झाले आहेत. तीन हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू असून, बरे होण्याचे प्रमाण ८९.७५ टक्के आहे. मंगळवारपर्यंत ६६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

संपादन - किशोरी वाघ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com