शहरात कोरोनाबळींची संख्या एक हजार दोनवर; तर जिल्ह्यात दिवसभरात २१७ पॉझिटिव्ह

अरुण मलाणी
Saturday, 16 January 2021

जिल्ह्यात दिवसभरात २१७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर २७३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वि‍रीत्‍या मात केली. यातून ॲक्टि‍व्‍ह रुग्‍णसंख्येत ५९ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ३६० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रात म्हणजेच शहरी भागात आतापर्यंत कोरोनामुळे एक हजारावर रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता. १५) जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्‍यू झाला असून, यापैकी तीन बाधित नाशिक शहरातील होते. यातून शहरातील कोरोनाबळींची संख्या एक हजार दोनवर पोचली आहे. 

जिल्ह्यात दिवसभरात २१७ पॉझिटिव्ह

शुक्रवारी नाशिक शहरातील ९२, नाशिक ग्रामीणमधील ९३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. गेल्‍या काही दिवसांपासून मालेगावला कोरोनारुग्‍णांची संख्या घटलेली होती. असे असताना मालेगाव महापालिका हद्दीत २६ कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्या‍बाहेरील सहा रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. बरे झालेल्या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १७१, नाशिक ग्रामीणमधील ९६, तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्‍णांचा समावेश आहे. चार मृतांमध्ये तीन नाशिक शहरातील व एक नाशिक ग्रामीण भागातील रुग्‍ण आहे. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

आतापर्यंत दोन हजार २५ बाधितांचा उपचारादम्‍यान मृत्‍यू

दरम्‍यान, दिवसभरात दाखल संशयित रुग्‍णांमध्ये नाशिक महपालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५४६, नाशिक ग्रामीण रुग्‍णालयांत १८, मालेगावला चार, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन, जिल्‍हा रुग्‍णालयात एक संशयित दाखल झाला आहे. सायंकाळी उसिरापर्यंत ७८३ अहवाल पॉझिटिव्‍ह होते. दरम्‍यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख १३ हजार ३७३ वर पोचली असून, यापैकी एक लाख नऊ हजार ९८८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्विरीत्‍या मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्या‍त उपचार घेणाऱ्या दोन हजार २५ बाधितांचा उपचारादम्‍यान मृत्‍यू झाला आहे.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in Nashik city One thousand victims nashik marathi news