चिंताजनक...मालेगावमध्ये पुन्हा होतोय उद्रेक...कोरोनाबळींची संख्या 72 वर!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

टोकडे (ता. मालेगाव) येथील 65 वर्षीय कोरोना संशयित वृद्ध महिलेचा सोमवारी (ता. 23) मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे येथील कोरोनाबळींची संख्या 72 झाली आहे.

नाशिक : टोकडे (ता. मालेगाव) येथील 65 वर्षीय कोरोना संशयित वृद्ध महिलेचा सोमवारी (ता. 23) मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे येथील कोरोनाबळींची संख्या 72 झाली आहे.

नवीन 25 रुग्णांची भर

टोकडे येथील 65 वर्षीय कोरोना संशयित वृद्ध महिलेचा सोमवारी (ता. 23) मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे येथील कोरोनाबळींची संख्या 72 झाली आहे. दुसरीकडे शहराची कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरू असतानाच मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असून, नवीन 25 रुग्णांची भर पडली. यात 13 पुरुष व तीनवर्षीय चिमुकलीसह 12 महिलांचा समावेश आहे. भवानी चौक-संगमेश्‍वर व टिळकनगर येथील एकाच कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून 20 जूनचा अपवाद वगळता रोज फक्त पाच ते सात अहवाल पॉझिटिव्ह येत होते. गेल्या तीन दिवसांत तर अहवाल निगेटिव्हच आले.

हेही वाचा > धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड..जागीच ठार...कारण वाचून व्हाल थक्क..

तीनवर्षीय चिमुकली कोरोनाबाधित

मंगळवारी मात्र टिळकनगर भागातील 85 वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्य पॉझिटिव्ह आले. भवानी चौक-संगमेश्‍वर येथील एकाच कुटुंबाशी संबंधित 14 रुग्ण आहेत. उर्वरित दोन रुग्णांत मोसम प्लाझा येथील एक व टोकडे येथील मृत वृद्धेचा समावेश आहे. तर, काकूबाईच्या बागेतील तीनवर्षीय चिमुकली कोरोनाबाधित आहे. शहरातील रुग्णसंख्या 957 झाली असून, त्यांपैकी 784 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. सध्या 51 रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा > अंत्यविधीची सुरू होती तयारी...अन् 'ती' एक बातमी येताच सगळ्यांनाच फुटला घाम..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona Outbreak in Malegaon again nashik marathi news