esakal | भय इथले थांबेना! मालेगावमध्ये पुन्हा कोरोना संकटाने डोके वर काढले; प्रसंगी पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon city 1.png

रुग्णसंख्या वाढल्यास केबीएच, मन्सुरा, हज हाउस येथील सीसीसी सेंटर पुन्हा कार्यान्वित करू. नागरिकांनी प्रतिबंधांचे पालन न केल्यास व रुग्णसंख्या कमी न झाल्यास प्रसंगी पुन्हा लॉकडाउन करू, असा इशारा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला. 

भय इथले थांबेना! मालेगावमध्ये पुन्हा कोरोना संकटाने डोके वर काढले; प्रसंगी पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. महापालिकेने कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वी सुमारे अडीच हजार खाटांची तयारी केली आहे. यातील चारशे खाटा ऑक्सिजन सुविधांयुक्त आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास केबीएच, मन्सुरा, हज हाउस येथील सीसीसी सेंटर पुन्हा कार्यान्वित करू. नागरिकांनी प्रतिबंधांचे पालन न केल्यास व रुग्णसंख्या कमी न झाल्यास प्रसंगी पुन्हा लॉकडाउन करू, असा इशारा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी गुरुवारी (ता.१३) पत्रकारांशी बोलताना दिला. 

कोरोना विषाणूच्या संकटाने पुन्हा डोके
काही दिवसांपूर्वी बऱ्यापैकी नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. काही दिवसांपासून रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. कासार यांनी मन्सुरा, सहारा, केबीएच, मसगा महाविद्यालयातील कोविड सेंटरला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या वेळी उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

मालेगावमधील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक 

कासार म्हणाले, की शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न वापरणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत. आगामी काळात प्रतिबंधांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे. लक्षणे दिसल्यास तातडीने स्वॅब तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. रुग्णसंख्या वाढत असली तरी, प्रशासन सज्ज आहे. पूर्वतयारी म्हणून केबीएच हायस्कूल येथे सर्व सुविधा केल्या आहेत. प्रसंगी अन्य सेंटर पुन्हा सुरू करू. या सर्व सेंटरवर आरोग्य, स्वच्छता, औषधे, गाद्या, पलंग, शौचालय, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, जेवणाची व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय व अन्य कर्मचाऱ्यांच्या नियोजनासंदर्भात विभागप्रमुखांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिका प्रशासन सज्ज : आयुक्त त्र्यंबक कासार 

गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास सार्वजनिक आरोग्याला बाधा आणली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी शहरवासीयांनी प्रशासनाला सहकार्य करावे. औषध, इंजेक्शन व साधनसामग्रीची कुठलीही कमतरता नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. डॉ. हितेश महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, उपअभियंता शांताराम चौरे, प्रभाग अभियंता मंगेश गवांदे, जयपाल त्रिभुवन, डॉ. योगेश पाटील, डॉ. स्वप्नील खैरनार, डॉ. जतीन कापडणीस, डॉ. मयूर शहा, डॉ. अबुल इरफान, डॉ. शहजाद आमीर, डॉ. शहेबाज अन्सारी, डॉ. हृषीकेश साळुंखे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

आयुक्त म्हणाले... 
* शहरातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी असलेल्या रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून घ्यावे 
* खासगी रुग्णालयांना २० टक्के खाटा राखीव ठेवणे आवश्‍यक 
* नियम शिथिलतेचा नागरिकांनी गैरफायदा घेतल्यास पुन्हा लॉकडाउन 
* शहरातील रुग्णांची लूट झाली नाही ही समाधानाची बाब 
* पॅरामेडिकल स्टाफची लवकरच भरती करणार 
* गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही 
* ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचाराची शासनाला माहिती, निधीसाठी साकडे 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वा
 
ऑगस्टमधील वाढती रुग्णसंख्या 
तारीख रुग्णसंख्या 

५ : ५७ 
६ : ३५ 
७ : ४४ 
८ : ५५ 
९ : ३२ 
१० : ६७ 
११ : १३ 
१२ : ४५ 
१३ : ९२