esakal | "नुकताच श्वास घेतला बाळाने नव्या जगात ..अन् मायलेकाचा आला 'असा' रिपोर्ट....शूर जीवाचे होताएत कौतुक!
sakal

बोलून बातमी शोधा

corona baby.jpg

मुलगी गरोदर असल्याने प्रसूतीसाठी माहेरी आली होती.परंतु येथील रहिवाशी मुलीला प्रसूतिच्या वेदना होवू लागल्याने नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे 5 मे रोजी तिची प्रसूति होवून पुत्ररत्न झाले.बाळाचा व त्याच्या आईचे स्वॅब घेतले असता आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर बाळाचा रिपोर्ट मात्र...अन् साऱ्यांनाच धक्का बसला.

"नुकताच श्वास घेतला बाळाने नव्या जगात ..अन् मायलेकाचा आला 'असा' रिपोर्ट....शूर जीवाचे होताएत कौतुक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / विंचूर : मुलगी गरोदर असल्याने प्रसूतीसाठी माहेरी आली होती.परंतु येथील रहिवाशी मुलीला प्रसूतिच्या वेदना होवू लागल्याने नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे 5 मे रोजी तिची प्रसूति होवून पुत्ररत्न झाले.बाळाचा व त्याच्या आईचे स्वॅब घेतले असता आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर बाळाचा रिपोर्ट मात्र...अन् साऱ्यांनाच धक्का बसला.

मुलीला सुरु झाल्या प्रसुतीवेदना..अन् मग...

विंचूर येथील माहेर असलेली मुलगी गरोदर असल्याने प्रसूतीसाठी माहेरी आली होती.परंतु येथील रहिवाशी व मालेगाव येथे पोलीस सेवेत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी (मुलीचे चुलते) हे कोरोना बाधित झाले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने मुलीला येथील कर्मवीर विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.मुलीला प्रसूतिच्या वेदना होवू लागल्याने नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे 5 मे रोजी तीची प्रसूति होवून पुत्र रत्न झाले.बाळाचा व त्याच्या आईचे स्वॅब घेतले असता बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. बाळाला रुग्णालयातच कोणाचा तरी संपर्क झाला असल्याने बाळाचा रीपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

चिमुरड्याने केली मात

बाळावर रुग्णालयात उपचार सुरु करुन आवश्यक खबरदारी घेण्यात आली.कोरोनाचा धोका जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना काहिसा जास्त असल्याचे सांगितले जाते मात्र केवळ पाच दिवसाच्या बाळाने आईचे दुध आणि औषधोपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर विजय मिळवला. 21 मे रोजी डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर ,नर्स आणि कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून बाळाचा गौरव केला. यावेळी बाळाची आईही भारावून गेली.

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

बाळाचे परिसरातून कौतुक

विंचूर येथील मुलीने गेल्या 5 मे रोजी नाशिक येथील शासकीय रुग्णालय येथे जन्म दिलेल्या पाच दिवसाच्या बाळास कोरोनाची बाधा झाली होती. परंतु या चिमुकल्या जीवाने कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्याने या बाळाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. 
         .

go to top