चौथ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात कोरोना झाला "स्प्रेड'..रुग्णांची तीव्रतेने वाढ

नरेश हळणोर : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 1 June 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाउन घोषित केला. गेल्या 17 मेस तिसऱ्यानंतर 31 मेपर्यंतचे चौथे लॉकडाउन घोषित केले गेले. परंतु या 4.0 लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता बहाल करण्यात आली. परिणामी परजिल्ह्यात अडकून असलेल्या नागरिकांना आपल्या गावी- शहरात जाण्यास परवानगी दिली गेली. त्यामुळे मुंबई-पुण्यासह अन्य परजिल्ह्यातील शहरांमध्ये अडकून असलेले नाशिक शहर-जिल्ह्यात परतले.

नाशिक : पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात कोरोनामुळे मालेगाव शहर हॉटस्पॉट म्हणून समोर आले. मात्र, चौथ्या लॉकडाउनमध्ये मालेगावातील कोरोना प्रसाराच्या वेगाची तीव्रता कमी झाली. तर दुसरीकडे मुंबई-पुणे कनेक्‍शनमुळे नाशिक शहरात 74.86 टक्के आणि उर्वरित जिल्ह्यात 42 टक्‍क्‍यांनी चौथ्या लॉकडाउनमध्ये कोरोनाचे रुग्ण तीव्रतेने वाढले आहेत. दरम्यान, चौथ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात 19 रुग्ण दगावले असून, सुमारे दीड हजार संशयित रुग्णही याच काळात रुग्णांमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. 

चौथ्या लॉकडाउनमध्ये कोरोना झाला "स्प्रेड' 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाउन घोषित केला. गेल्या 17 मेस तिसऱ्यानंतर 31 मेपर्यंतचे चौथे लॉकडाउन घोषित केले गेले. परंतु या 4.0 लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता बहाल करण्यात आली. परिणामी परजिल्ह्यात अडकून असलेल्या नागरिकांना आपल्या गावी- शहरात जाण्यास परवानगी दिली गेली. त्यामुळे मुंबई-पुण्यासह अन्य परजिल्ह्यातील शहरांमध्ये अडकून असलेले नाशिक शहर-जिल्ह्यात परतले. 

नाशिक शहरात 74 टक्‍क्‍यांनी वाढले रुग्ण
या परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे मालेगाव वगळता नाशिक शहर व उर्वरित जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा कमी होत, तो वाढू लागला. नाशिक शहरात तर चौथ्या लॉकडाउनमध्ये कोरोनाचे रुग्ण 74.86 टक्‍क्‍यांनी, तर मालेगाव वगळता उर्वरित जिल्ह्यांत 42 टक्‍क्‍यांनी वाढले. त्याचवेळी कोरोनारुग्णांची मोठी संख्या असलेल्या मालेगाव शहरात 19.34 टक्के असे रुग्णवाढीचे प्रमाण होते. शनिवार (ता.30) अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार 174 रुग्ण असून, यातील 383 बाधित रुग्ण लॉकडाउन-4 मध्ये वाढले असून, हे प्रमाण 32.62 टक्के आहे. त्याचवेळी दुसरीकडे 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, हे प्रमाण 32.67 टक्के आहे. तसेच, लॉकडाऊन- 4 मध्ये एक हजार 467 संशयित रुग्ण जिल्ह्यातील कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल झाले होते. यात नाशिक शहरात 481, मालेगाव शहरात 301, तर उर्वरित जिल्ह्यात 675 संशयित रुग्णांचा समावेश आहे. 
हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

जिल्ह्यात दीड हजार संशयितांचीही चाचणी 
* चौथ्या लॉकडाउनमधील स्थिती (30 मेअखेरपर्यंत) (कंसात आत्तापर्यंतची एकूण संख्या) : 
पॉझिटिव्ह रुग्ण : 383 (1174) 
कोरोनामुक्त : 266 (814) 
संशयित रुग्ण : 1467 (निगेटिव्ह रुग्ण 9698) 
कोरोना मृत्यू : 19 (61) 
 

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'
*रुग्ण नाशिक शहर मालेगाव शहर उर्वरित जिल्हा परजिल्हा 
पॉझिटिव्ह रुग्ण (कंसात प्रमाण) 137 (74.86 टक्के) 148 (19.34 टक्के) 71 (42 टक्के) 25 (54.54टक्के) 
कोरोनामुक्त 29 176 46 15 
संशयित रुग्ण 481 301 675 -- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona "spreads" in fourth lockdown nashik maratg