'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'

head constable.jpg
head constable.jpg

नाशिक : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुरण पोळीचे जेवण करून मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलो...सोबतच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली समजले, सर्वांना भुजबळ हॉस्टेलवर पाच दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले...अनेकांना श्वसनाचा त्रास होत होता अन् तपासणीत नंतर कोरोना पॉझिटिव्ह आलो...पण मनात जिद्द असल्याने कोरोनाला नमवल्याचे ते सांगता...

स्वत:ला अन् इतरांना दिला धीर...

मी जयवंत सूर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण एस.पी. ऑफिस येथे पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. नेमणुकीस असताना २६ एप्रिल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुरण पोळीचे जेवण करून मालेगाव येथे बंदोबस्ताला जाण्यासाठी सज्ज झालो. तेथे जाताच दोन तीन दिवसांनी पन्नास वर्षांच्या वरील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ४ ते ५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आम्हाला सर्वांना भुजबळ हॉस्टेलवर पाच दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर नसल्याने माझ्यासोबत इतर जोडीदारदेखील पॉझिटिव्ह आले त्यामुळे आम्ही सर्व घाबरलो व मविप्र येथे पुढील उपचारासाठी दाखल झालो होतो. अनेकांना श्वसनाचा त्रास होत होता. मला मात्र काहीच त्रास होत नव्हता त्यामुळे मी लवकरच कोरोनामुक्त होईल अशी जिद्द होती. सकाळी लवकर उठून प्राणायाम, योगासने व शतपावली करत मी कोरोनाला हरवले आहे. माझ्याबरोबरचे अनेक सहकार्यांना श्वसनाच्या त्रासामुळे अपोलो हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हे सर्व बघून इतर कर्मचारी घाबरले होते. माझ्या बरोबरच त्यांच्या मनाची खच्चीकरण न होवू देता सर्वांना धीर देण्याचे काम केले. 

मित्र दिलीप घुले व भाऊसाहेब माळी यांच्या निधनामुळे धसकाच

माझा जवळचे मित्र दिलीप घुले व भाऊसाहेब माळी यांच्या निधनामुळे सर्वांमध्ये कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली होती. मात्र वेळेवर योग्य आहार, वैद्यकीय उपचार, गरम पाणी, काढा तसेच नियमित व्यायाम व योगासने करून आधी केलेले शारीरिक श्रम यांमुळे कोरोनाला पूर्णपणे हरवण्यात यशस्वी झालो आहे. २९ मे रोजी तब्बल एक महिन्यानंतर कोरोनावर मात करत घरी पोहचलो आहे. मात्र अजून काही मित्रमंडळी क्वारंटाइन असल्याने काळजी वाटत आहे. मनाचे खच्चीकरण न होवू देता मनाच्या प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com