esakal | VIDEO : नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅब बंद...का आली नामुष्की?
sakal

बोलून बातमी शोधा

corona lab nashik.png

कोरोना टेस्टिंगच्या खासगी प्रयोगशाळेचा आग्रह लोकप्रतिनिधी आणि काही अधिकाऱ्यांनी धरला होता. मात्र हा आग्रह फलद्रूप झाला नसल्याने लॅबला बाहेरून अडथळे आणले जाताहेत का? असा प्रश्न नाशिककरांना भेडसावू लागला आहे. लॅबमधील टेस्टिंग बंद पडल्याची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी संपलेले साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

VIDEO : नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅब बंद...का आली नामुष्की?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिककरांच्या पाठपुराव्यातून नाशिकमध्ये 28 एप्रिल पासून सुरू झालेली कोरोना टेस्टिंग लॅब बंद पडली. Swab मशीन मध्ये लावण्यासाठी लागणारी प्लास्टिक प्लेट (वेल) संपल्याने टेस्टिंग कालपासून (ता 6) बंद झाले.
मविप्रच्या डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झालेल्या लॅबची पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी केली होती. त्यावेळी लॅबमुळे कोरोना वैद्यकीय उपाययोजनांना वेग येईल असे प्रशासन तर्फे स्पष्ट करण्यात आले होते. पण 8 दिवस लॅब बंद ठेवण्याची नामुष्की नाशिककरांवर आली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला महाविद्यालयाने वेल उपलब्ध नसल्याने टेस्टिंग बंद ठेवण्यात आल्याची माहिती कळविण्यात आली आहे.

खासगी लॅबच्या आग्रहामुळे अडथळे?
कोरोना टेस्टिंगच्या खासगी प्रयोगशाळेचा आग्रह लोकप्रतिनिधी आणि काही अधिकाऱ्यांनी धरला होता. मात्र हा आग्रह फलद्रूप झाला नसल्याने लॅबला बाहेरून अडथळे आणले जाताहेत का? असा प्रश्न नाशिककरांना भेडसावू लागला आहे. लॅबमधील टेस्टिंग बंद पडल्याची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी संपलेले साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा > अचानक आगीच्या ज्वाला आकाशात उठल्या...सगळ्यांचाच उडाला थरकाप!

हेही वाचा > वाह! पोलिसदादा मनचं जिंकलं की हो...वेळप्रसंगी फावडं घेऊन थेट लागले कामाला!