Corona Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात चौदाशे रूग्‍ण कोरोनामुक्‍त, तर १ हजार ६१ नवीन बाधित

अरुण मलाणी
Monday, 21 September 2020

सोमवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५९५, नाशिक ग्रामीणचे ४२९, मालेगावचे २९ तर जिल्‍हाबाह्य आठ रूग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १ हजार १३७, नाशिक ग्रामीणचे २३७, मालेगावचे २३ तर जिल्‍हाबाह्य तीन रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यात बरे होणाऱ्या रूग्‍णांची संख्या वाढत असून, सलग तिसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता.२१) दिवसभरात १ हजार ०६१ नवीन बाधित आढळून आले. तर चौदाशे रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. सतरा रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्याची नोंद आहे. सद्यस्‍थितीत ९ हजार २७२ बाधित उपचार घेत आहेत. 

नव्‍याने आढळलेले बाधित

सोमवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५९५, नाशिक ग्रामीणचे ४२९, मालेगावचे २९ तर जिल्‍हाबाह्य आठ रूग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १ हजार १३७, नाशिक ग्रामीणचे २३७, मालेगावचे २३ तर जिल्‍हाबाह्य तीन रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणचे सहा, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन आणि जिल्‍हाबाह्य एका रूग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून आतापर्यंतच्‍या कोरोना बाधितांची एकूण संख्या ६५ हजार ०६३ झाली आहे. तर ५४ हजार ६०१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार १९० बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. तर सद्य स्‍थितीत ९ हजार २७२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

दरम्‍यान दिवसभरात नाशिक शहरातील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ५८८ संशयित, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २५०, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २०, जिल्‍हा रूग्‍णालयात सहा संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ५९५ अहवाल प्रलंबित होते. यापैकी १ हजार ०५४ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates Fourteen hundred patients were cured today nashik marathi news