'जो घरमा थांबई त्यानंच आयुष्य लांबई'...अहिराणी पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल!

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध हास्यविनोदाच्या काही पोस्ट बघून कोरोनाबाबतचा तणावही कमी होताना दिसत आहे. तसेच "कोरोना गो गो करोना' हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात "व्हायरल' झाला. त्यामुळे सोशल मीडियावर आज काय नवीन पोस्ट आली काय? यावर लोकांचे लक्ष लागून आहे. "कोरोना विषाणू'ची नागरिकांच्या मनात भीती असली, तरी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच करमणूक होऊन भीती दूर केली जात आहे.

नाशिक : सध्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पाहायला मिळते आहे. अनेक नेटिझन्स कोरोनाची जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत पुढे येत आहेत. यातच आता सोशल मीडियावर अहिराणी भाषेतील संदेश प्रभावीपणे जनजागृती करताना दिसत आहे. 

लोकांना घरीच थांबवण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आवाहन

मालेगाव येथील डिझायनर भूषण आढावे यांची अहिराणी भाषेतील " जो घरमा थांबई त्यानंच आयुष्य लांबई" अशा आशयाची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. 
लोकांना घरीच थांबवण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आवाहन या पोस्टमधून करण्यात आले आहे. हॅशटॅग गो कोरोना आणि टिकटॉकच्या व्हिडिओनंतर आता सध्या नवनवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतेय आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या जनजागृतीबाबतच्या पोस्टमधून कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी कशाप्रकारची काळजी घेतली पाहिजे याचे संदेशही सोशल मिडियावर दिले जात आहे. भूषण आढावे यांनी बनवलेली अहिराणी पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल झाली आहे.

आज काय नवीन पोस्ट आली काय? यावर लोकांचे लक्ष

कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध हास्यविनोदाच्या काही पोस्ट बघून कोरोनाबाबतचा तणावही कमी होताना दिसत आहे. तसेच "कोरोना गो गो करोना' हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात "व्हायरल' झाला. त्यामुळे सोशल मीडियावर आज काय नवीन पोस्ट आली काय? यावर लोकांचे लक्ष लागून आहे. "कोरोना विषाणू'ची नागरिकांच्या मनात भीती असली, तरी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच करमणूक होऊन भीती दूर केली जात आहे. कोरोना व्हायरस'च्या घडामोडींचे व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर रोज विविध हास्य विनोद पोस्ट, गाणी, टिकटॉकचे व्हिडिओ, कविता, गाणीसुद्धा "व्हायरल' होत आहेत. 

हेही वाचा > #Lockdown : 'बाहेर निघू नका, पोलीस खेळताय खरोखरचा पब्जी!'...कामगिरीचं होतंय कौतुक

जागतिक महामारीचा स्रोत बनलेला हा भयावह आजार एवढ्या वेगाने वाढतोय की ज्याची कल्पना काही दिवसांपूर्वी जगात कोणालाही नव्हती, सर्वांनीच यावर मात करण्यासाठी सरकारला एक मदत करा जिथे असाल तिथेचं रहावे आणि ह्या कोरोना संसर्गाची साखळी मोडीत काढावी. यासाठी समाजात जनजागृती करावी, त्यांना आवाहन करावे म्हणून मी ही पोस्ट तयार केली आहे. - भूषण आढावे, मालेगाव

हेही वाचा > photos : लॉकडाउनमध्येही नाशिककर जपताहेत सामाजिक भान; रोज शंभर जणांकडून 'रक्‍तदान'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's awareness on social media nashik marathi news