esakal | नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना
sakal

बोलून बातमी शोधा

wadala corona 1.jpg

परिसरात लोकसंख्येच्या घनतेच्या मानाने दलदलीचा आणि गर्दीचा भाग असल्याने नागरिकांकडून सोशल डिस्टिंगचा उडत असून त्याची परिणीती कोरोना प्रसार वाढण्यात होतांना रोज वाढणाऱ्या आकडेवारी निदर्शनात आले आहे, कोरोनाचा प्रभाव दिवसागणिक वाढत आहे.

नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना

sakal_logo
By
संदीप पवार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र मालेगाव आता काही प्रमाणावर पूर्वस्थितीत येत असतानाच नाशिक शहर आणि जिल्यात आता कोरोनाचा हॉटस्पॉट हे गाव  झाल्याने नाशिककरांच्या चिंतेचा विषय झाला आहे.

कोरोनाचा प्रभाव दिवसागणिक वाढतोय..

नाशिकच्या वडाळा परिसरात लोकसंख्येच्या घनतेच्या मानाने दलदलीचा आणि गर्दीचा भाग असल्याने नागरिकांकडून सोशल डिस्टिंगचा उडत असून त्याची परिणीती कोरोना प्रसार वाढण्यात होतांना रोज वाढणाऱ्या आकडेवारी निदर्शनात आले आहे, कोरोनाचा प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबई- पिंपळगाव एका ड्रायव्हरच्या कनेक्शन पासून सुरुवात झालेला कोरोनाचा प्रसार  वडाळा गाव, सादिक नगर, आलिशान सोसायटी, मुमताज नगर, व्हीनिस सोसायटी,स्वस्तिक नगर आणि यापासून बाधित वडाळा गावाला लागून असलेल्या  खोडे नगर,अशोका मार्ग, आणि जुने नाशिक , कुंभार वाडा परिसर, पखाल रोड ,परिसरात  रुग्णांची संख्या वाढल्याने नाशिक शहरात आणि जिल्ह्यात मुंबईतील धारावी प्रमाणेच वडाळागाव ठरला आहे . येथील मूलभूत सोयी सुविधांचा अभाव, अज्ञान आणि आरोग्याविषयी अनास्थाच्या अभावामुळे परिसरातील नागरिकांमध्ये या आजाराच्या अनुषंगाने लक्षण असली तरी बचावात्मक उपाययोजनेच्या अभावामुळे वडाळा परिसरात कोरोनाचा आकडा  वाढतच आहे.

हेही वाचा > भीतीदायक! दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार?..

अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे
वडाळा परिसरात राहणाऱ्या  नागरिकांचे दूध बजार,भंगार  व्यापार,भाजीपाला मालवाहतूक विक्रेते यांचा मुख्य निवास असून त्याच्या माध्यमातून लॉकडाऊन च्या काळात  आणि  मुंबई, पुणे , मालेगाव  येथून चोरून लपून येणाऱ्यां मुळेही कोरोनाच्या  रुग्ण वाढण्यासाठी खतपाणी घातले यात शंका नाही.१ जूनला संपूर्ण वडाळा गाव पोलिस प्रशासनाने बंधिस्त क्षेत्र करूनही ये- जा साठी वडाळा रस्ता मोकळा करा या गावकऱ्यांच्या अट्टहासामुळे म्हणा निमित्त म्हणून प्रसार लगतच्या भागात मात्र झपाट्याने झालाच .
संपूर्ण वडाळा गाव आणि परिसरात धारावी प्रमाणे कडक  उपाय योजना आणि आरोग्य तपासणी अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे असून येथील नागरिकांमध्ये कोरोनाच्या खबदारीच्या संदर्भात जाणीवजागृती करणे गरजेचे आहे.

हेही वाचा > वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?