शिक्षण उपसंचालक कार्यालयात भ्रष्टाचार थांबेना...प्रत्येक कामात पैशांची मागणी होत असल्याचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने प्रभारी शिक्षण उपसंचालकांकडे बैठक घेण्याची मागणी केली आहे. प्रत्येक कामात पैशांची मागणी होत असल्याने कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग नेमका कधी जागा होणार, असा प्रश्‍न कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित करू लागले आहेत.

नाशिक : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने प्रभारी शिक्षण उपसंचालकांकडे बैठक घेण्याची मागणी केली आहे. प्रत्येक कामात पैशांची मागणी होत असल्याने कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग नेमका कधी जागा होणार, असा प्रश्‍न कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित करू लागले आहेत.

भ्रष्टाचाराच्या तक्रारींनी पुन्हा उचल खाल्ली

बनावट शालार्थ आयडीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण विधानसभेत गाजले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रभारी शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकारी निलंबित केले. त्यानंतर नितीन उपासनी यांच्याकडे प्रभारी सूत्रे सोपविल्यावर वातावरण काहीसे निवळले होते. उपासनी यांना हटवून कारभार बदलल्यावर या कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींनी पुन्हा उचल खाल्ली आहे. 

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची बैठकीची मागणी 

शारीरिक अंतर ठेवून आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना करून केटीएचएम महाविद्यालयात बैठक घेण्याची विनंती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी प्रभारी शिक्षण उपसंचालकांना केली आहे. या बैठकीसाठी शिक्षक, पदवीधर आमदार, विभागीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रभारी शिक्षण उपसंचालकांनी या बैठकीची तयारी दर्शविल्यानंतर बैठकीत पैशांच्या मागणीच्या आरोपांचा पाऊस पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

शालार्थसंबंधी नकारात्मक कामकाज 
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रश्‍नांबाबत बैठकीची मागणी करणाऱ्या संघटनेने शालार्थसंबंधीच्या नकारात्मक कामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्रुटींच्या पूर्ततेच्या प्रलंबित फायली, निवृत्त शिक्षकांची पेन्शनची प्रलंबित प्रकरणे, बदली मान्यतेचे प्रलंबित प्रस्ताव, अशा विविध मुद्द्यांवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण उपसंचालक कार्यालयाला घेरण्याची तयारी बैठकीनिमित्त केली आहे. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption in the office of the Deputy Director of Education nashik marathi news