तीन वेळेस आले ई-पासमूळे अडथळे...तरीही मुहूर्त साधलाच!

yeola lagn.jpg
yeola lagn.jpg

तीन वेळेस ई-पासमूळे अडथळे येऊनही अखेर चौथ्यांदा मुहूर्त साधलाच..!
येवल्यातील गोसावी परिवाराने खर्चाला फाटा देऊन उरकला साधेपणाने विवाह

सकाळ वृत्तसेवा
नाशिक / येवला : विवाहासाठी लॉन्स ठरला, तारीख निश्चित झाली.वाजंत्री,भटजी,आचारी ठरले किंबहुना पत्रिकाही वाटप झाल्या आणि लॉकडाऊनचा स्पीडब्रेकर समोर उभा ठाकला.त्यावर आता खर्चाला फाटा देऊन साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय येवला व पाचोर्‍यातील गोसावी परिवाराने घेतला.मात्र त्यालाही तीन वेळेस पास मिळण्यास अडथळे आले.. तरीदेखील साधलाच मुहुर्त..

अखेर चौथ्या प्रयत्नात पास झाले

साधेपणाने विवाह करण्याची तयारी सुरू झाली पण वधूकडील नातेवाईकांना विवाहासाठी येवल्यात येण्यासाठी जिल्हा बंदीमुळे ई-पासची आवश्यकता होती. नियमानुसार त्यांनी तीन वेळेस अर्ज केला परंतु तांत्रिक कारणाने तीनही वेळेस त्यांचा अर्ज फेटाळला आणि विवाहाचा मुहूर्त ही टळत गेला.
मात्र,पास मिळविण्याचा चंग बांधत येथील सामाजिक कार्यकर्ते व एमव्ही कलेक्शनचे संचालक विजय गोसावी व मकरंद तक्ते यांनी काही जाणकारांकडून पासाची माहिती मिळवत मुलीकडील मंडळींना याबाबत कळवले आणि अखेर चौथ्या प्रयत्नात ईपास मिळाला.त्यानंतर मुलीकडील आई-वडील भाऊ,मामा अशी मोजकी मंडळी येवल्यात आले आणि गोसावी परिवाराच्या श्रीराम कॉलनीत बंगल्यापुढे अवघ्या ४०-४५ जणांचा उपस्थित अगदी साधेपनाणे थाटामाटात हा विवाह संपन्न झाला.मुलाचे वडील सुनील गोसावी,चुलते अनिल गोसावी, संजय गोसावी,विजय गोसावी तसेच मुलीचे वडील दिलीप गोसावी आदींनी यासाठी पुढाकार घेतला.शहरातील प्रतिष्ठित यांनी या सोहळ्याचे कौतुक केले आहे.

काही तासात अगदी साधासुधा विवाह

विवाहासाठी लॉन्स ठरला, तारीख निश्चित झाली.वाजंत्री,भटजी,आचारी ठरले किंबहुना पत्रिकाही वाटप झाल्या आणि लॉकडाऊनचा स्पीडब्रेकर समोर उभा ठाकला.त्यावर आता खर्चाला फाटा देऊन साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय येवला व पाचोर्‍यातील गोसावी परिवाराने घेतला.मात्र त्यालाही तीन वेळेस पास मिळण्यास अडथळे आले पण या अडथळ्यांना न जुमानता पुन्हा पाससाठी वारंवार प्रयत्न करून अखेर पास मिळवला आणि काही तासात हा अगदी साधासुधा विवाह उरकला..

लॉकडाऊन उठल्यावर पुन्हा थाटात करू

येवला येथील भोलेनाथ ट्रान्सपोर्टचे संचालक सुनील गोसावी यांचा मुलगा दर्शन व नेरी (ता.पाचोरा जि.जळगाव) येथील दीपक गोसावी यांची कन्या प्रिती याचा विवाह २६ मार्च रोजी निश्चित झाला होता.थाटामाटात विवाह करण्यासाठी सर्व ठरले किंबहुना लग्नपत्रिका  वाटून झाल्या होत्या.याचदरम्यान अचानक कोरोना व्हायरस आला अन लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे विवाह स्थगित करण्यात आला. हा विवाह लॉकडाऊन उठल्यावर पुन्हा थाटात करू असे कुटुंबातील काही सदस्यांचे म्हणणे होते मात्र यावर चर्चा होऊन दोन्ही बाजूंनी साधेपणाने विवाह करुन समाजापुढे आदर्श उभा करण्याचा निर्णय झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com