esakal | भयानक प्रकार! हुंडा दिला नाही म्हणून डोक्यात घातला लाकडी दांडका..
sakal

बोलून बातमी शोधा

domestic-violence.jpg

आरोपीचा हेतू पत्नीचा खून करणे नव्हता, तर त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरला, हे पुराव्यासह न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यास न्यायाधीश वाघवसे यांनी सदोष मनुष्यवधाखाली दोषी धरून शिक्षा सुनावली.

भयानक प्रकार! हुंडा दिला नाही म्हणून डोक्यात घातला लाकडी दांडका..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लाकडी दांडक्‍याने मारले असता त्यात पत्नीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी पतीस प्रधान जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे यांनी पाच वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वासाळी (ता. इगतपुरी) येथे 2015 मध्ये ही घटना घडली होती. शिवाजी श्रावण खेताडे (वय 30, रा. वासाळी, ता. इगतपुरी) असे आरोपी पतीचे नाव आहे. 11 जून 2015 ला वासाळी (ता. इगतपुरी) येथे ही घटना घडली होती. 

अशी घडली घटना... 
शिवाजी खेताडे याने पत्नी आशा खेताडे (27) हिच्याशी 11 जूनला भाजी न केल्याच्या कारणावरून भांडण केले. तसेच माहेरच्यांनी लग्नात हुंडा दिला नाही, याचा राग मनात धरून त्याने तिच्या डोक्‍यावर लाकडी दांडका मारला. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक के. डी. बच्छाव यांनी तपास करत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटला प्रधान जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या न्यायालयात वर्ग होऊन सुनावणी झाली. आरोपीचा हेतू पत्नीचा खून करणे नव्हता, तर त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरला, हे पुराव्यासह न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यास न्यायाधीश वाघवसे यांनी सदोष मनुष्यवधाखाली दोषी धरून शिक्षा सुनावली. सरकारी वकील एस. जी. कडवे यांनी 12 साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक निरीक्षक निसार सय्यद, हवालदार व्ही. बी. निचीत, ज्योती उगले यांनी पाठपुरावा केला.  

हेही वाचा > एक स्त्रीलाच दुसरी स्त्री नकोशी!...अज्ञात निष्ठुर मातेने 'नकोशीला' झाडाच्या अडचणीत टाकून केले पलायन

हेही वाचा > लग्न जमण्याच्या आधीच 'दोघांना' भेटणं पडलं चांगलच महागात...! 

go to top