COVID-19 : सिव्हिलमध्ये "कोविड-19'' व्यवस्थापन कक्ष...24 तास सुरू राहणार 'वॉर रूम'!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

शहर-जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात "कोविड- 19' व्यवस्थापन कक्ष (इर्मजन्सी ऑपरेशन सेंटर) वॉर रुम स्वरूपात कार्यान्वित करण्यात आले आहे. हे सेंटर 24 तास सुरू राहणार आहे. या कक्षात जिल्ह्यातील कोरोना संशयित, बाधित रुग्णांची माहिती संकलित करून त्या संदर्भातील माहितींचा रोजच्या रोज आढावा घेतला जाणार आहे. 

नाशिक : शहर-जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात "कोविड- 19' व्यवस्थापन कक्ष (इर्मजन्सी ऑपरेशन सेंटर) वॉर रुम स्वरूपात कार्यान्वित करण्यात आले आहे. हे सेंटर 24 तास सुरू राहणार आहे. या कक्षात जिल्ह्यातील कोरोना संशयित, बाधित रुग्णांची माहिती संकलित करून त्या संदर्भातील माहितींचा रोजच्या रोज आढावा घेतला जाणार आहे. 

इर्मजन्सी ऑपरेशन सेंटर (वॉर रूम) कार्यान्वित

जिल्ह्यात आत्तापर्यंत 40 हून अधिक कोरोना संशयितांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असले, तरी एकाही रुग्णाला कोरोनाची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही येत्या काळात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास वा कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्कता बाळगून आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात इर्मजन्सी ऑपरेशन सेंटर (वॉर रूम) कार्यान्वित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये तीन शिफ्टमध्ये 24 तास कामकाज सुरू असणार आहे. त्याचे नियंत्रण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे आहे. 

हेही वाचा > PHOTOS : COVID-19 : पाळणाघर विसावलं कोरोनाच्या खांद्यावर!

आदेशाची अंमलबजावणी करण्याचे कामकाज या विशेष कक्षेतून होणार

कोरोनाबाबत रुग्णांची माहिती संकलित करणे, परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांची नियमित तपासणी केल्याचा अहवाल गोळा करणे, कोरोनाची लागण झाली असल्यास कोरोनाबाधित रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात होता, याची माहिती गोळा करणे, शासनाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांसोबत संपर्क साधून त्यांना माहिती देणे आणि आदेशाची अंमलबजावणी करणे असे कामकाज या विशेष कक्षातून केले जाणार आहे.  

हेही वाचा > 'या' तरुणाने केली मंदीवर मात...रोजगारनिर्मितीसाठी लढविली अशी शक्कल!

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid-19 Management Room in Civil hospital nashik marathi news