BREAKING आनंदवार्ता ! नाशिक जिल्ह्यातही पोहचली सिरमची कोविशिल्ड लस; पहिल्या टप्प्यातील डोसेस पोहचले 

अभिजीत सोनावणे
Wednesday, 13 January 2021

नाशिककरांचाही आता कोरोनापासून बचाव होऊ शकणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातही सिरमची कोविशिल्ड लस पोहचली आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आहे.

नाशिक : नाशिककरांचाही आता कोरोनापासून बचाव होऊ शकणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातही सिरमची कोविशिल्ड लस पोहचली आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आज (ता.१३) पहाटे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये कोविशिल्ड लस पोहचली आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस

नाशिक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस पोहचले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य देणार कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण 17 केंद्रांवर लसीकरण होणार आहे तर दुपारी 12 वाजता नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी लसीचं वितरण होणार आहे.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covishield vaccine of serum also reached Nashik district marathi news