अखेर विवाहितेला मिळाला न्याय; सासरच्या जाचाला कंटाळून केलेली आत्महत्या

विनोद बेदरकर
Saturday, 24 October 2020

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पंचवटीतील हिरावाडी परिसरात घडली होती. या प्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काय घडले नेमके?

नाशिक : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पंचवटीतील हिरावाडी परिसरात घडली होती. या प्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नाच्या सहा महिन्यांनंतर छळ

प्रिया गायकवाड (रा. त्र्यंबकनगर, हिरावाडी, पंचवटी) असे विवाहितेचे नाव आहे. प्रियाच्या वडिलांच्या तक्रारीनुसार लग्नाच्या सहा महिन्यांनंतर तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरवात झाली. फुलांच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी छळ करण्यात आला. कंटाळून तिने २१ ऑक्टोबरला सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पती कुणाल गायकवाड, सासरे विलास गायकवाड, दीर योगेश गायकवाड, सासू, दोघी नणंदा अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा > धक्कादायक! उपजिल्हाधिकारी दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतले; जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ

चाकूने हल्ला करत जबरी लूट 
नाशिक : युवकास अडवून चाकू, तसेच इतर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याच्याकडील रोकड, सोन्याची चेन हिसकावत लूट केल्याची घटना बुधवारी (ता. २१) लहवित रोड येथे घडली. प्रतीक शेटे, मयूर शेटे, संदीप शेटे, साहिल शेटे (रा. वियजनगर, भगूर) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी राहुल घुगे (वय २७, रा. उदय कॉलनी, पंचवटी) याच्या तक्रारीनुसार, राहुल लहवित रोड येथून जात असताना त्यास अडवून टोळक्याने चाकू, तसेच इतर धारदार शस्त्रांनी मारहाण करून त्याच्याकडील दहा हजारांची रोकड व गळ्यातील चेन हिसकावली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा >क्षणार्धात संसाराची राखरांगोळी! चव्हाण कुटुंबियांचे ५० हजारांचे नुकसान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes against marital suicide nashik marathi news