esakal | सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात
sakal

बोलून बातमी शोधा

gund ghoti.jpg

काही वर्षांपूर्वी पोलिसांवरदेखील हल्ले केल्याचे परजिल्ह्यात व घोटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अनेक जिल्ह्यांतून तडीपार असलेला हा सराईत अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढून पैशाचे आमिष दाखवून गुन्हे घडवून आणत असल्याचे तपासात समोर आले.

सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

नाशिक / घोटी : काही वर्षांपूर्वी पोलिसांवरदेखील हल्ले केल्याचे परजिल्ह्यात व घोटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अनेक जिल्ह्यांतून तडीपार असलेला हा सराईत अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढून पैशाचे आमिष दाखवून गुन्हे घडवून आणत असल्याचे तपासात समोर आले.

पम्यावर पोलिसांवरदेखील हल्ले केल्याचे गुन्हे

अनेक जिल्ह्यांतून तडीपार असलेला हा सराईत अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढून पैशाचे आमिष दाखवून गुन्हे घडवून आणत असल्याचे तपासात समोर आले. काही वर्षांपूर्वी पोलिसांवरदेखील हल्ले केल्याचे परजिल्ह्यात व घोटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शहरात विविध अवैध धंद्यांत सहभाग असलेल्या या सराईताने व्यावसायिक भावेश चांदमल भन्साळी यांच्या भर नागरी वस्तीतील आनंद बंगला या राहत्या घराचे व दुकानाचे (ता. १८) मध्यरात्री शटर तोडून सिगारेटची आठ लाख ७० हजार ३१५ रुपयांची घरफोडी करून जिल्हा व परजिल्ह्यात मालाची विक्री केल्याचे समोर आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक रोहित मोरे यांच्‍या पथकाने घटनेचा मागोवा घेत चार संशयितांना अटक केली. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

बहुतांश माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश

घोटी शहरातील सराईत प्रमोद (पम्या) गंगाधर शिंदे (वय ४०) याची घोटी पोलिसांनी बाजारातून वरात काढली. घोटीत गुन्हेगारी फोफावण्यात त्याचा मोठा वाटा राहिला. तालुक्याचे धार्मिक व व्यापारी पेठेचे प्रमुख ठिकाण आहे. शहरात सराईत पम्याची मोठी दहशत होती. संशयित पम्याकडून गुन्ह्यातील बहुतांश माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांना आशा आहे. इगतपुरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांचा पोलिस कोठडी दिली. गुन्ह्यातील रूपेश मनोहर बेलेकर (वय २८), सूरज शशिकांत अग्रवाल (३०), वैभव विनायक बोराडे (१८) यांना अटक करण्यात आली.  

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

go to top