"चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून शहरात लॉकडाऊन आहे. परजिल्ह्यातून विनापरवानगी कोणीही शहरातून जाऊ नये यासाठी शहराच्या सीमावर्ती भागात कडेकोट नाकाबंदी करण्यात आलेली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य वाहनांना परवानगी नाही. असे असले तरी गेल्या रविवारी (ता. 3) एक हायफाय चारचारी कार पुणे महामार्गावरून सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने आले असता...

नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून शहरात लॉकडाऊन आहे. परजिल्ह्यातून विनापरवानगी कोणीही शहरातून जाऊ नये यासाठी शहराच्या सीमावर्ती भागात कडेकोट नाकाबंदी करण्यात आलेली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य वाहनांना परवानगी नाही. असे असले तरी गेल्या रविवारी (ता. 3) एक हायफाय चारचारी कार पुणे महामार्गावरून सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने आले असता...

अशी घडली घटना..

नगरकडून विनापरवानगी चारचाकी कार नाशिकरोडच्या शिंदेगाव टोलनाक्‍यावर आली. टोलनाक्‍यावरील पोलिसांनी चौघांना रोखले असता, त्यांनी इर्मजन्सी कारण सांगत धुळ्याला जायचे असल्याचे सांगितले. परंतु त्यांच्याकडे प्रवासाची कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे तपासणी नाक्‍यावरील पोलिसांनी जाण्यास नकार दिला. तरीही कारमधील प्रवाशांनी आग्रह धरत "चहापाण्या' करण्याचेही आमिष दाखविले. त्यावेळी नाक्‍यावरील पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करून क्वारंटाईन करण्याची धमकी देत तात्काळ आल्या मार्गाने परत जाण्याचा सल्ला दिला. अखेरिस कारमधील एका प्रवाशाने नाशिक शहर गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखविल्यानंतर, हे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार "डि-कॉय' ऑपरेशन असल्याचे समोर आले. मात्र यातून शहराच्या सीमावर्ती तपासणी नाक्‍यांवर पोलिस सतर्क असल्याचे दिसून आले. 

अच्छा तर असे ठरले होते..
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून शहरात लॉकडाऊन आहे. परजिल्ह्यातून विनापरवानगी कोणीही शहरातून जाऊ नये यासाठी शहराच्या सीमावर्ती भागात कडेकोट नाकाबंदी करण्यात आलेली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य वाहनांना परवानगी नाही. असे असले तरी गेल्या रविवारी (ता. 3) एक हायफाय चारचारी कार पुणे महामार्गावरून सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने आले असता, हे डि-कॉय ऑपरेशन करण्यात आले होते. अखेरिस पोलिसांनी क्वारंटाईन करून गुन्हा दाखल करण्याचा दम दिला. त्यानंतर कारमधील एकाने ओळखपत्र दाखविल्यानंतर सदरचा प्रकार हा छुप्या कॅमेऱ्यातून करण्यात आलेले डीकॉय ऑपरेशन असल्याचे समोर आले. 

वेशांतर करून ऑपरेशन 
शहरात कोरोनाचे रूग्ण वाढल्यानंतर अनेक व्यक्ती बाहेरून आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सीमावर्ती नाक्‍यावरील बंदोबस्ताची अचानक गुप्तपणे तपासणी करण्याचे आदेश गुन्हे शाखेस दिले होते. त्यानुसार उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखा, शाखा एक, दोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध 3 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके वेश बदलून, खासगी वाहने घेऊन काही मार्गांवरून शहराबाहेर जाऊन तपासणी नाक्‍यांवरून वाहने विनापरवानगी आणत असल्याचे दाखवून त्या नाक्‍यांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी घेत आहेत. याप्रकारे रविवारी (ता.3) शिंदेगाव, महामार्गावरील दहावा मैल, गंगापूर रोडवरील जेहान सर्कल येथे असे ऑपरेशन केले. 

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

पोलीस आयुक्ताच्या आदेशानुसार वेळोवेळी गुप्त तपासणी

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर शहरात विविध मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. परवानगीशिवाय शहरात वाहने-व्यक्ती येणार नाहीत. तसेच शहरातील व्यक्ती परवानगीशिवाय बाहेर पडणार नाही. याची काळजी घेत आहोत. परंतु काही दिवसांनंतर तपासणी कामात ढिलाई येते. असे घडून नये म्हणून पोलीस आयुक्ताच्या आदेशानुसार वेळोवेळी गुप्तपणे तपासणी नाक्‍यांची तपासणी केली जात आहे. - लक्ष्मीकांत पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक. 

हेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "D-Coy" operation by police officers on toll plazas nashik marathi news