"काबाडकष्टाने पिकवलेल्या पिकांना पूर्व वैमनस्याची दृष्ट..!' अज्ञाताने नुकसानापोटी शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर घातला घाला..

ज्ञानेश्वर गुळवे : सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

काकडी नुकतीच फळ धारणेवर आली होती. बाजारात काकड़ी पिकाला चांगला बाजार भाव असल्याने त्यांनी यंदा काकडीची लागवड केली होती. शेतात मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी चाळीस हजारों वर लागवड खर्च करुन जोमदार काकडी  बनविली होती. मात्र कुणीतरी पूर्व वैमनस्यातुन म्हस्के यांच्या शेतातील उभ्या काकडी वर रात्री अंधाराचा फायदा घेतला,

नाशिक / अस्वली स्टेशन : काकडी नुकतीच फळ धारणेवर आली होती. बाजारात काकडी पिकाला चांगला बाजार भाव असल्याने त्यांनी यंदा काकडीची लागवड केली होती. शेतात मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी चाळीस हजारों वर लागवड खर्च करुन जोमदार काकडी  बनविली होती. मात्र कुणीतरी पूर्व वैमनस्यातुन म्हस्के यांच्या शेतातील उभ्या काकडी वर रात्री अंधाराचा फायदा घेतला,

पूर्व वैमनस्याची दृष्ट..!'

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील भरवीर बु येथील रावसाहेब बाबूराव म्हस्के यांच्या एक एकर काकडी पिकावर कुणीतरी अज्ञात इसमाने रात्री अंधारात संपूर्ण काकडी पिकावर राउंडअप तणनाशक फवारणी केली आहे. शेतातील उभे पिक दोन दिवसांत जळून खाक झाल्यामुळे म्हस्के यांचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काकड़ी नुकतीच फळ धारणेवर आली होती. बाजारात काकडी पिकाला चांगला बाजार भाव असल्याने त्यांनी यंदा आपल्या गट नंबर ३७८ मध्ये काकड़ीची लागवड केली होती. शेतात मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी चाळीस हजारों वर लागवड खर्च करुन जोमदार काकडी बनविली होती. मात्र कुणीतरी पूर्व वैमनस्यातुन म्हस्के यांच्या शेतातील उभ्या काकडीवर रात्री अंधाराचा फायदा घेत राउंडअप तनशाक फवारणी करून काकडीचे नुकसान केले आहे. दूस-या दिवशी शेतात गेल्या नंतर बघितले असता काकडीचे वेल पुर्णपणे जळून कोमेजून चालले असल्याचे बघून म्हस्के हतबल झाले. याबाबत त्यांनी घोटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्यामुळे इतर शेतकरी देखील म्हस्के यांना आधार देत आहेत. दरम्यान आज तालुका कृषी अधिकारी तसेच घोटी पोलिसांनी शेतावर येवून पिकाचा पंचनामा केला असुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भरवीर,निनावी, साकुर फाटा परिसरातील शेतक-यांनी केली आहे.

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

पीक जळून खाक..घोटी पोलिसांत तक्रार.

"काबाड कष्ट करुन हजारों रुपयांचा लागवडीचा खर्च केला तो केवळ दोन पैसे हाती येतील या आशेने पोटच्या मुला प्रमाणे काकडी पीकाची काळजी घेवून उत्तम प्रतीचे पीक उभे केले होते. मात्र कोणीतरी तणनाशक फवारणी केल्याने फळधारणा झालेले एका एकरावरील संपूर्ण पीक जळून खाक झाले आहे.  लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. -रावसाहेब म्हस्के, काकडी उत्पादक शेतकरी.

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: damage to the farmer's vertical crop at ghoti nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: