निसर्गाचा कोप थांबता थांबेना.. कोरोनाचे संकट काय कमी होते? आता त्यात 'हे'.

ambasan dagad.jpg
ambasan dagad.jpg

नाशिक : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच सामान्य माणसाचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण भागात तर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात अगोदरच माणूस संयम राखत जगत आहे..पण अशातही निसर्गाक़डून होणारा कोप मात्र काही थांबायचे नाव घेत नाही..अशाच एका घटनेने नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथे राहणारे रहिवासी मात्र प्रचंड घाबरले आहेत

जेव्हा निसर्गाचा कोप थांबत नाही तेव्हा...

अंबासन येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घराच्या भिंतीवर मंगळवारी (ता.12) रात्री आठच्या सुमारास दगड कोसळल्याने कोळीवाड्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घरात कुणीही राहात नसल्यामुळे अनर्थ टळला. याबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार ग्रामपंचायतीला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अंबासनला दगड कोसळल्याने घरांचे नुकसान झाल्याचे समजते. तसेच डोगरांच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्‍यात आहे.

ग्रामस्थांची मागणी
ग्रामदैवत खंडेराव महाराजांचे डोंगरावर मंदिर असून, याच डोंगराच्या पायथ्याशी अनेक कुटुंबीयाचे वास्तव्य आहे. कोळीवाड्यातील व आदिवासी भागातील काही भाग डोंगराच्या दरडीखाली असल्याचे चित्र आहे. डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायतीने मोठा नाला तयार करावा, जेणेकरून डोंगरावरील दगड अडकविण्यास मदत होईल, तसेच पावसाळ्यात गल्लीबोळांतून वाहणारे पाणी बंद होईल, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

ग्रामसभेत ठराव मंजूर
येत्या काही दिवसांत निधी उपलब्ध होताच हे काम सुरू केले जाईल. याबाबत 26 जानेवारीला झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. - रवींद्र कोर, ग्रामपंचायत सदस्य, अंबासन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com