esakal | शेतकऱ्याच्या मेहनतीवर वाईट नजर आणि क्षणातच सारं संपल! दीड एकरवरील द्राक्षबाग उदध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

chinchkhed grapes.jpg

नवीन घड व द्राक्षवेलीची पाने जळत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेधनेंच्या निदर्शनास आले. नंतर त्यांनी टाकीतील पाणी व वेलीच्या काड्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला.

शेतकऱ्याच्या मेहनतीवर वाईट नजर आणि क्षणातच सारं संपल! दीड एकरवरील द्राक्षबाग उदध्वस्त

sakal_logo
By
योगेश मेधणे

चिंचखेड (जि.नाशिक) : नवीन घड व द्राक्षवेलीची पाने जळत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेधनेंच्या निदर्शनास आले. नंतर त्यांनी टाकीतील पाणी व वेलीच्या काड्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला.

दीड एकरावरील द्राक्षबाग उदध्वस्त; शेतकऱ्याची वणी पोलिसांत तक्रार 

चिंचखेड  येथील संदीप मेधने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. त्यांचा निम्मा बाग पोंगा, तर निम्मा दोडा अवस्थेत होता. त्यांनी आपल्या बागेची २ व २१ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात गोडीबहार छाटणी घेतली. या बागा पोंगा व दोडा अवस्थेत असताना नवीन घड व द्राक्षवेलीची पाने जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नंतर त्यांनी टाकीतील पाणी व वेलीच्या काड्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यामध्ये २४ डी हे तणनाशक टाकल्याचे परीक्षणात समोर आले आहे. याबाबत मेधने यांना नुकताच अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे विकृताने खोडसाळ प्रकार केल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

पाण्याच्या टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे नुकसान 

मात्र कष्ट घेऊनही आता हंगामातील नियोजन कोलमडले आहे.  द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप मेधने यांच्या दीड एकरावर असलेल्या द्राक्षबागेच्या फवारणीकामी लागणाऱ्या पाण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत समाजकंटकाने तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे पाच लाखांवर नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत त्यांनी वणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पुन्हा छाटणी करून हाती काही आले, तर खरे; अन्यथा बाग तोडण्याची वेळ येऊ शकते, असे मेधने यांनी सांगितले. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर