दारणा नदी धोकादायक पातळीवर; रात्रीस चालतोय धक्कादायक खेळ!

गोपाळ शिंदे
Wednesday, 27 January 2021

जल जीवन है! असे असतांना कधी दारणेच्या पाण्यावर ऑइल तेलाचे तवंग तर कधी शहरातील रात्रीच्या अंधारात सुरू असलेला खेळ..या सर्व गोष्टींमुळे दारणा नदी अधिकच धोकादायक होत चालली आहे.

घोटी (जि.नाशिक) : मराठवाड्यासह इगतपुरी तालुक्याच्या सिंचनाची व ग्रामीण भागाची तहान भागविणारी दारणा नदी दिवसांगणिक प्रदूषित होत चालली आहे. याकडे वेळीच लक्ष वेधून भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांची सिंचन विभाग,सेवाभावी संस्था यांसह दारणप्रेमींनी आवाज उठवला तरच पुढील पिढ्यांना सोयीचे ठरणार आहे. 

आवाज उठवला तरच पुढील पिढ्यांना सोयीचे

तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने मोहिनी घातलेल्या व्यवसाहिकांनी दारणा नदी सिंचन फुगवट्यावर मातीचा भराव टाकून पक्के बांधकाम करीत अतिक्रमणे वाढवली आहे. बांधकाम व भरावांनी दारनेचे प्रदीर्घ पात्र दिवसांगणिक लहान होत असून याच पक्क्या बांधकाम केलेल्या कंपन्या,हॉटेल,फार्म हाऊस यांनी प्रक्रिया न करता सांडपाण्यासह,ड्रेनेज पाणी, थेट दारणा नदी पत्रात सोडले जात आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

माता,वृद्ध,लहान बालके यांच्या जीवाला धोका
'जल जीवन है! असे असतांना कधी दारणेच्या पाण्यावर ऑइल तेलाचे तवंग तर कधी शहरातील रात्रीच्या अंधारात टाकलेला कचरा,रासायनिक दुर्गंधी युक्त रसायन,लग्न समारंभातील जेवणाच्या थर्माकोल पत्रावळ्या, प्लास्टिक कचरा गोळा करून टाकला जात आहे. मेलेले भटके कुत्रे टाकून पद्धतशीर पोबारा केला जात आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपालिका,ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना ह्या दारणेच्या पाण्यावर अवलंबून आहे. कित्येक गावांत फिल्टर प्लांट नसल्याने नागरिकांना थेट दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. गरोदर माता,वृद्ध,लहान बालके यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देवळे सह परिसरात नदीपात्रात शेवळसह, पानवेल,अझोलाची चादर चढुन दुर्गंधी वाढली आहे. या दुष्परिणामाची नागरिकांच्या सांगण्यावरून सिंचन विभागाने कोणत्याही प्रकारची काळजी घेतल्याचं जाणवत नाही. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

उपचारासाठी आर्थिक झळ
ज्या प्रकल्पांसाठी जमिनी भूसंपादित केल्या गेल्या त्याचा उपयोग स्थानिकांच्या जीवावर उठला गेला आहे. दूषित पाण्यामुळे खासगी रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात तोबा गर्दी पहावयास मिळते, यासाठी नागरिकांना उपचारासाठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. यातून पुढे भविष्यात जर्जर आजारांना आमंत्रण दिले जात आहे. सिंचन विभागाने तातडीने दारणा प्रदूषण रोखण्याबरोबरच व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणे थोपवून कार्यवाहीचे आदेश द्यावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darna River Pollution nashik marathi news