नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांवर 'दातार जेनेटिक्स'कडून पाचशे कोटींचा दावा

Datar Genetics claims 500 crore against Nashik District Collector Nashik marathi news
Datar Genetics claims 500 crore against Nashik District Collector Nashik marathi news

नाशिक : शासकीय आणि खाजगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यामध्ये तफावत अढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दातार जेनेटिक्‍स यांच्‍याकडे कोरोनाच्‍या चाचण्या करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे.  यानंतर दातार लॅबकडून जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांविरुध्द पाचशे कोटींचा मानहाणीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

तसेच दातार जेनेटिक्सकडून त्यांच्याविरोधात करण्यात आलेली कारवाई ही एकतर्फी असल्याचे म्हणण्यात आले आहे. प्रकरणात प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, कारवाई करताना शासकीय लॅबमघ्ये फेर चाचणी केल्याचा तपशील देण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. कोरोनाला रोखण्यात कमी पडलेल्या प्रशासकीय यंत्रणा कातडी वाचवण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहेत. सोबतच दातार जेनेटिक्स लॅबकडे आतापर्यंतच्या सर्व चाचण्याचे नमुने उपलब्ध आहेत. ते नमुने जिल्हाधिकाऱ्यांनी एनआयव्ही या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवावेत, त्यामध्ये फरक अढळून न अल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा तसेच असेही प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यापुर्वी जिल्हा प्रशासनाने दातार लॅब बंद का करण्यात येऊ नये, असा खुलासा लॅबच्‍या अस्‍थापनेकडून मागविला होता. तसेच अन्‍य दोन लॅबची सखोल चौकशी करण्यासह जिल्ह्यातील लॅबच्‍या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी शनिवारी (ता. २७) दिले होते. शासकीय व खासगी लॅबमध्ये येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्‍ह अहवालाचा मुद्दा खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्‍या बैठकीत गाजला होता. यासंदर्भात केलेल्‍या सखोल चौकशीत तीन लॅबची कार्यप्रणाली संशयाच्‍या भोवऱ्यात सापडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com