जायचं होतं श्रीलंकेला....पण टूर कंपनीनेच केला स्वप्नांचा चुराडा!

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

नोव्हेंबर 2019 मध्ये ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांचे बुकिंग होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील राहुल चित्ते यांनी कॉलेजरोडवरील दातार टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडे बुकिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, ते दोघे 5 नोव्हेंबर 2019 रोजी दातार ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी संशयित लेखा कुलकर्णी यांना बेझलवार यांनी श्रीलंका पर्यटनासाठी 27 डिसेंबर 2019 ते 3 जानेवारी 2020 पर्यंतच्या बुकिंगची माहिती दिली.

नाशिक : गेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरिस श्रीलंक पर्यटनांसाठी जाणाऱ्या शहरातील 13 पर्यटकांना कॉलेजरोडवरील दातार टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीने तब्बल 80 लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संशयित लेखा कुलकर्णी उर्फ लेख निनाद शहा हिच्याविरोधात गंगापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दातार टूर्स-ट्रॅव्हल्सने पर्यटकांना असा घातला गंडा 

संजित दिलीप बेझलवार (रा. गणेशनगर, पाईपलाईन रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना नववर्षानिमित्ताने डिसेंबर अखेरिस परदेश पर्यटनासाठी सहकुटूंब जायचे होते. त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांचे बुकिंग होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील राहुल चित्ते यांनी कॉलेजरोडवरील दातार टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडे बुकिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, ते दोघे 5 नोव्हेंबर 2019 रोजी दातार ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी संशयित लेखा कुलकर्णी यांना बेझलवार यांनी श्रीलंका पर्यटनासाठी 27 डिसेंबर 2019 ते 3 जानेवारी 2020 पर्यंतच्या बुकिंगची माहिती दिली. त्यानुसार, संशयित कुलकर्णी यांनी 6 लाख 24 लाख रुपयांचा खर्च असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी कुटूंबियांशी सल्लामसलत करीत, 7 नोव्हेंबर रोजी पुन्हा दातार कंपनीच्या कार्यालयात जाऊन काही रक्कम रोख तर काही धनादेशाद्वारे लेखा कुलकर्णी यांच्याकडे जमा केली. त्यानंतर अनेकदा ते दातार टूर्सच्या कार्यालयात जाऊन दिलेल्या रकमेची रिसिट व टूर्सचे तिकिट याबाबतची कागदपत्रांची मागणी केली. परंतु दरवेळी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

19 डिसेंबर रोजी ते पुन्हा कार्यालयात केले असता, ते बंद होते आणि कार्यालयाबाहेर अनेकांची गर्दी होती. जमा झालेले सर्व पर्यटक होते आणि ते त्यांच्या टुर्सची तिकिटे घेण्यासाठी आलेली होती. तर संशयित लेखा कुलकर्णी हिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे कंपनीने बेझलवार यांच्यासह सुमारे 13 पर्यटकांची 79 लाख 50 हजार 100 रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक नरेंद्र बैसाणे हे तपास करीत आहेत. 

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Datar Tours-Travel fraud with tourists Nashik Crime marathi news