....ही बाब समजताच "शिवप्रेमी' भडकले..वातावरण चिघळले..

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 21 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी (ता. 19) राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे सिडको अध्यक्ष विशाल डोके यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल पार्कचे "शिवछत्रपती उद्यान' असे नामकरण करावे, अशी मागणी करत नामफलकाचे उद्‌घाटन केले होते. महापालिका कार्यालयाला तक्रार प्राप्त झाल्याने येथील विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाने फौजफाट्याच्या संरक्षणात फलक काढून टाकला. ही बाब शिवप्रेमींना समजताच, त्यांनी..

नाशिक : महापालिका सिडको विभाग अतिक्रमण निर्मूलन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 20) सेंट्रल पार्क येथील "शिवछत्रपती उद्यान' नामफलक काढल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या सोनालीराजे पवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय कार्यालयात शिवप्रेमींनी ठिय्या देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला. 

असा घडला प्रकार...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी (ता. 19) राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे सिडको अध्यक्ष विशाल डोके यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल पार्कचे "शिवछत्रपती उद्यान' असे नामकरण करावे, अशी मागणी करत नामफलकाचे उद्‌घाटन केले होते. महापालिका कार्यालयाला तक्रार प्राप्त झाल्याने येथील विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाने फौजफाट्याच्या संरक्षणात फलक काढून टाकला. ही बाब शिवप्रेमींना समजताच, त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचा निषेध नोंदवत विभागीय कार्यालयांच्या दालनात ठिय्या देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या. जोपर्यंत फलक सन्मानाने ठरलेल्या जागी लावत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

हेही वाचा > भयंकर! इमारतीच्या गेटवर नाव भलतेच..अन् आतमध्ये चालायचा "धक्कादायक' प्रकार..

सिडको विभागीय कार्यालयात शिवप्रेमींचे आंदोलन 

वातावरण चिघळत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. ऐनवेळी छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या सोनालीराजे पवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांनी सामंजस्याची भूमिका घेत आंदोलकांना शांत केले. त्यानंतर ज्येष्ठांच्या विनंतीला मान देत व नियम बाजूला ठेवत अधिकाऱ्यांनी फलक आंदोलकांच्या ताब्यात दिला. शिवप्रेमींनी हा फलक पुन्हा लावला. सोनालीराजे पवार व मामा ठाकरे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी विशाल डोके, संजय भामरे, देवा वाघमारे, अर्जुन वेताळ, आशिष अहिरे, विनोद भडांगे, सुनील जगताप, नाना ठोंबरे, प्रीतम भांबरे, नितीन माळी, अक्षय खंडारे, योगेश गांगुर्डे, जीवन सोनवणे, अजय पाटील, मदन जमदाडे, सुनील घुगे, सुनील ढाकणे, विनोद गोसावी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivpremi's movement at CIDCO departmental office Nashik Marathi News