दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

सुदाम गाडेकर
Tuesday, 18 August 2020

बैलपोळ्य़ाचा सण म्हणून आपल्या बैलाला सजविण्यासाठी शेतकरी उत्सूक असतो. सर्जाराजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या दिवशी  सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले ...पण बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटनेने संपूर्ण ममदापूर गावच हळहळले. काय घडले ?

नाशिक / नगरसूल :बैलपोळ्य़ाचा सण म्हणून आपल्या बैलाला सजविण्यासाठी शेतकरी उत्सूक असतो. सर्जाराजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या दिवशी  सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले ...पण बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटनेने संपूर्ण ममदापूर गावच हळहळले. काय घडले ?

असा घडला प्रकार

ममदापूर (ता. येवला) येथील तरुण शेतकरी श्रीराम वामन साबळे (वय २३) रविवारी (ता.१६) दुपारी ते पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी कोळगाव शिवारानजीक असलेल्या बंधाऱ्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. सायंकाळी उशिरा हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. स्थानिक तरुणांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार झाल्याने मृतदेह सापडला नाही. सोमवारी (ता. १७) सकाळी स्थानिक तरुणांना श्रीराम यांचा मृतदेह बंधाऱ्यात आढळल्यानंतर शवविच्छेदनासाठी येवला येथे पाठविण्यात आला.

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

गावात हळहळ व्यक्त

श्रीराम याच्यामागे आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. येवला पोलिसांनी घटनेची नोंद केली. दरम्यान, बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडून शेतकरी तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.  

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a young farmer in mamdapur nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: