गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय स्थगित; 'हे' आहे कारण

प्रमोद सावंत
Monday, 14 September 2020

धरण ९६ टक्के भरले आहे. गिरणा व मोसम या दोन्ही नद्यांना चांगले पूरपाणी येत असून, साठा ९६ टक्क्यांवर नियंत्रित करण्यात येणार होता. त्यानंतर रविवारी धरणाचे दरवाजे आवश्‍यकतेनुसार उघडले जाणार होते. मात्र, तीन दिवसांपासून ‘कसमादे’तील चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर या चारही धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे.​

नाशिक / मालेगाव : गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यामुळे धरणात ९६ टक्के साठा आहे. यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर या धरण परिसरातील पाऊस थांबला आहे. गिरणा व मोसम या दोन्ही नद्यांचे पूरपाणी ओसरले आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे तूर्त तरी उघडले जाणार नाहीत. परिस्थिती अशीच राहिल्यास धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतरच दरवाजे उघडले जातील.

गिरणा धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय स्थगित

धरणात रविवारी (ता. १३) सकाळी सहापर्यंत २० हजार ६४० दशलक्ष घनफूट साठा होता. सायंकाळी सहापर्यंत २० हजार ९०० दशलक्ष घनफुटांपर्यंत साठा पोचला होता. धरण ९६ टक्के भरले आहे. गिरणा व मोसम या दोन्ही नद्यांना चांगले पूरपाणी येत असून, साठा ९६ टक्क्यांवर नियंत्रित करण्यात येणार होता. त्यानंतर रविवारी धरणाचे दरवाजे आवश्‍यकतेनुसार उघडले जाणार होते. मात्र, तीन दिवसांपासून ‘कसमादे’तील चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर या चारही धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे. हरणबारी धरणातून केवळ ८४६ क्यूसेक पाणी मोसम नदीत वाहत आहे. चणकापूरमधून ६६१, केळझरमधून ३०, तर पुनंदमधून ३३० क्यूसेक पाणी वाहत असून, दोन्ही नद्यांचे पाणी ओसरले आहे. याचा परिणाम गिरणा धरण भरण्यास विलंब होणार आहे.

संपादन : रमेश चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to open the gates of the girna dam postponed nashik marathi news