दोन दिवसांत कोरोनाच्या ॲक्टिव्‍ह रुग्‍णांत २६५ ने घट 

अरुण मलाणी
Monday, 17 August 2020

दोन दिवसांत आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत नव्‍याने एक हजार ८६ कोरोनाबाधित आढळल्‍याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४ हजार ४५७ झाली, तर एक हजार ३५१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या १८ हजार ९३१ झाली आहे.

नाशिक : दोन दिवसांत आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या तुलनेत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता. १६) अशा दोन दिवसांत नव्‍याने एक हजार ८६ कोरोनाबाधित आढळल्‍याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४ हजार ४५७ झाली, तर एक हजार ३५१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या १८ हजार ९३१ झाली आहे.

नव्याने आढळले एक हजार ८६, तर बरे झालेले एक हजार ३५१ 

दरम्यान, दोन दिवसांत १३ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. शनिवारी दिवसभरात ५८५ कोरोनाबाधित आढळून आले. यात ३३८ नाशिक शहरातील, १७४ नाशिक ग्रामीण भागातील, ७३ मालेगाव परिसरातील रुग्ण आहेत. रविवारी दिवसभरात ५०१ नवीन कोरोनाबाधित आढळले. यापैकी २७३ नाशिक शहरातील, १८३ ग्रामीण व ४५ रुग्‍ण मालेगाव महापालिका हद्दीतील आहेत. शनिवारी ६०१ आणि रविवारी ७५० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, त्‍यांना घरी सोडण्यात आले. 

गृहविलगीकरणात १६९ रुग्‍णांचा समावेश
दोन दिवसांत १३ जणांचा मृत्‍यू झाला. यापैकी नऊ शहरातील, तर चार रुग्‍ण ग्रामीण भागातील आहेत. चेहेडी येथील ३६ वर्षीय महिला, अशोक चौकातील ६३ वर्षीय महिला, उपनगर येथील ७० वर्षीय महिला, सिडकोच्‍या साईबाबानगर येथील ६९ वर्षीय पुरुष, वडाळागावातील ४० वर्षीय पुरुष, देवळालीगावातील ४० वर्षीय महिला, वडाळा रोड येथील ६७ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील ५६ वर्षीय महिलेचा कोरानामुळे मृत्‍यू झाला. ग्रामीण भागात चांदवड येथील ७० वर्षीय पुरुष, लासलगाव येथील ४५ वर्षीय महिला, कौळाणे येथील ५० वर्षीय पुरुष, रावळगावच्‍या ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्‍यान, दोन दिवसांत जिल्‍हा रुग्णालयात सात, महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६१०, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १९, मालेगाव महापालिका रुग्‍णालयात ३६, तर नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात १६९ रुग्‍णांचा समावेश आहे. 

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

मालेगावमध्ये शंभरावर रुग्ण 
मालेगाव : शहरात दोन दिवसांत ११८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी (ता. १५) ७३, तर रविवारी (ता. १६) ४५ कोरोनाबाधित आढळले. त्याचबरोबर शहर व तालुक्यातील तीन कोरोनाबाधित आणि दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सावतानगर येथील ५१ वर्षीय पुरुष, रावळगाव येथील ६५ वर्षीय पुरुष व कौळाणे येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे, तसेच हजारखोली भागातील ८२ वर्षीय पुरुष व ठेंगोडा (ता. बागलाण) येथील ५५ वर्षीय पुरुष अशा दोघा संशयितांचा मृत्यू झाला. दरम्यान, शहरातील कोरोनाबळींची संख्या ९५ झाली असून, तालुक्यातील १५ जणांचा बळी गेला आहे. रविवारी नव्याने ३६ रुग्ण दाखल झाले. ५८३ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.  

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decreased corona active patients in two days nashik marathi news