बोगस डॉक्टरमुळे खरे डॉक्टरच हैराण; स्टिंग ऑपरेशनमुळे भांडाफोड 

विनोद बेदरकर
Friday, 16 October 2020

नाशिक शहरात एका बोगस मेंदु विकार तज्ञामुळे शहरातील खरे डॉक्टरच हैराण झाले आहेत. मेंदु विकार तज्ञ डॉ. चंद्रशेखर चिरमाडे यांनी स्टिंग ऑपरेशन करीत हा भांडाफोड केला.

नाशिक : नाशिक शहरात एका बोगस मेंदु विकार तज्ञामुळे शहरातील खरे डॉक्टरच हैराण झाले आहेत. मेंदु विकार तज्ञ डॉ. चंद्रशेखर चिरमाडे यांनी स्टिंग ऑपरेशन करीत हा भांडाफोड केला. याप्रकरणी न्युरो क्लब ऑफ नाशिक व नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन देत, बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. 

सहा महिन्यांपासून मेंदुविकार तज्ञांच्या व्हॉटसग्रुपमध्ये डॉ. उपासणी नावाचा मेंदु विकार तज्ञ कार्यरत असून तो माझा (डॉ.चिरमाडे) यांचा सहायक असल्याचे इतरांना सांगत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्याने, त्यांनी थेट कथीत डॉ. उपासनी यांना फोन लावून खातरजमा केली असता, संबधित उपासनी डॉक्टरच खोटे बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टर कधी शिकला कुठे शिकला इथपासून तर त्याच्या पदवी प्रमाणपत्रांपर्यत सगळ्याच बाबीची खऱ्या डॉक्टरांनी शोध सुरु केला अखेर हे सगळे संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर आयएमए व न्युरो क्लब ऑफ नाशिकतर्फे महापालिकेचे आयुक्त व पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. कथीत उपासनी नावाच्या न्युरो सर्जन जळगावचा असून सध्या इंदिरानगरला कार्यरत आहे त्याने अनेकांना गंडे घातल्याचा डॉक्टरांचा संशय आहे अशाही खऱ्या डॉक्टरांच्या तक्रारी आहे. 

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for action against bogus doctors nashik marathi news