कर विवरणपत्रे भरताना ‘सीएं’ची तारांबळ; मुदतवाढीची मागणी   

charted accountant
charted accountant

नाशिक : गेल्या वर्षाचा म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवाल, प्राप्तिकर विवरणपत्र, वस्तू व सेवाकर वार्षिक विवरणपत्र, व्यवसाय कर विवरणपत्र, त्रैमासिक जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबरअखेर मुदत ठरवून दिली आहे. दरम्यान एवढ्या कमी कालावधीत विवरणपत्रे भरून देण्यासाठी कर सल्लागारांची तारांबळ उडाली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शहरातील चार्टर्ड अकाउंटंटकडून करण्यात आली आहे. 

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउन झाले. त्यानंतर हळूहळू कामाला सुरवात झाली. परंतु आजही अनेक कर सल्लागार चार्टर्ड अकाउंटंट इतर कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे उद्योगधंदे सुरळीत नाहीत. ही सर्व विवरणपत्रे भरण्यास उशीर होणार आहे. कर सल्लागारावर कामाचा खूप मोठा ताण वाढणार आहे. याप्रसंगी या सर्व तारखा कमीत कमी तीन ते चार महिन्यांपर्यंत पुढे ढकलाव्या, अशी मागणी उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनरस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, नाशिक प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सुनील देशमुख, निवृत्ती मोरे, राजेंद्र बकरे आदींनी केली. ३१ मार्चपर्यंत मुदत द्यावी. सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी किमान तीन ते चार महिने लागणार आहेत. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com