हॉटेलमधील आचाऱ्याच्या मृत्यूचे गुढ रहस्य; संशयास्पद घटनेचा पोलीसांकडून शोध सुरू

युनूस शेख
Wednesday, 21 October 2020

 रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून दोन दिवसांसाठी खोलीत राहू देण्याची मागणी त्यांनी केली. रात्री उशिरा दोघे गप्पा मारून झोपण्यास निघून गेले. सकाळी अकराच्या सुमारास सैनउद्दीन त्यांना उठविण्यासाठी गेले असता खोलीचा लोखंडी दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर जे काही दृश्य दिसले त्याने साऱ्यांनाच धक्का बसला. काय घडले नेमके?

जुने नाशिक : रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून दोन दिवसांसाठी खोलीत राहू देण्याची मागणी त्यांनी केली. रात्री उशिरा दोघे गप्पा मारून झोपण्यास निघून गेले. सकाळी अकराच्या सुमारास सैनउद्दीन त्यांना उठविण्यासाठी गेले असता खोलीचा लोखंडी दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर जे काही दृश्य दिसले त्याने साऱ्यांनाच धक्का बसला. काय घडले नेमके?

हॉटेलमधील आचार्याच्या मृत्यूचे गुढ रहस्य

मोहम्मदअली आब्दुल कादर सारडा सर्कल येथील एका खासगी हॉटेलमध्ये आचारी होता. त्याच ठिकाणी त्याचे वास्तव्य होते. रविवारी (ता. १८) तो गावी जात असल्याचे सांगून तेथून निघून गेला. त्यानंतर सायंकाळी तो गावातील ओळखीच्या सैनउद्दीन मोहम्मद (वय ४५) याला भेटण्यासाठी तलावाडी भागातील शेलार हॉटेलवर गेला. रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून दोन दिवसांसाठी खोलीत राहू देण्याची मागणी त्यांनी केली. सोमवारी (ता. १९) रात्री उशिरा दोघे गप्पा मारून झोपण्यास निघून गेले. मंगळवारी (ता. २०) सकाळी अकराच्या सुमारास सैनउद्दीन त्यांना उठविण्यासाठी गेले असता खोलीचा लोखंडी दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी वेल्डिंग काम करणाऱ्याच्या मदतीने दरवाजाचा तोडून आत प्रवेश केला असता, मोहम्मदअली आब्दुलकादर मृतावस्थेत आढळले. त्यांच्या बॅगेतून त्यांचे कागदपत्रे सापडले. मृतदेह विच्छेदनसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.  

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

आकस्मिक मृत्यूची नोंद

तलावाडी परिसरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या खोलीत ज्येष्ठ व्यक्ती मृतावस्थेत आढळली. मोहम्मदअली आब्दुलकादर (वय ६०, मूळ रा. कन्नूर, केरळ, सध्या सारडा सर्कल) असे मृताचे नाव आहे. भद्रकाली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chef in the hotel Suspicious death nashik marathi news