मका व बाजरीची खरेदी मर्यादा वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

रोशन खैरनार
Wednesday, 23 December 2020

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे सुरू झालेल्या मका आणि बाजरी खरेदीला दीड महिना उलटत नाही तोच शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत ही खरेदी थांबवली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी नुकतीच मुंबई येथे भुजबळ यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती केली. 

सटाणा (जि. नाशिक) : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे सुरू झालेल्या मका आणि बाजरी खरेदीला दीड महिना उलटत नाही तोच शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत ही खरेदी थांबवली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी नुकतीच मुंबई येथे भुजबळ यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती केली. 

नोंदणी पूर्ण केलेल्या हजारो शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार असल्याने शासनाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मका व बाजरीची खरेदी मर्यादा वाढवावी आणि नोंदणी केलेल्या मालाची खरेदी करीत शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर

तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार

खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने महाराष्ट्राला ४ लाख ४ हजार ९०५ क्विंटल मका खरेदीची मान्यता दिली आहे. पण मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्पादनामुळे त्यात बदल करून मक्याची खरेदी मर्यादा १५ लाख क्विंटल तर बाजरी खरेदीची मर्यादा १ लाख ७०० क्विंटलपर्यंत वाढवल्यास उर्वरित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवून नोंदणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या मका व बाजरीची खरेदी करून घ्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी मंत्री भुजबळ यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली असून केंद्र सरकारशी यापूर्वी दोन वेळा पत्रव्यवहारही केला आहे. त्यामुळे याप्रश्नी सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for increase in purchase limit for maize and millet nashik marathi news