
''कर्जाचा बोजा फेडू शकत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस कुणासही जबाबदार धरू नये.'' अशा आशयाची चिठ्ठी खिशात ठेवत निवृत्ती आहेर यांची धक्कादायक एक्झिट. घटनेने कुटुंबाचा जीवघेणा आक्रोश. वाचा नेमके काय घडले?
देवळा (नाशिक) : ''कर्जाचा बोजा फेडू शकत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस कुणासही जबाबदार धरू नये.'' अशा आशयाची चिठ्ठी खिशात ठेवत निवृत्ती आहेर यांची धक्कादायक एक्झिट. घटनेने कुटुंबाचा जीवघेणा आक्रोश. वाचा नेमके काय घडले?
अशी आहे घटना
निवृत्ती राजाराम आहेर (वय ४९) हे देवळा तहसील कार्यालयात झेरॉक्स सेंटरवर काम करून कुटुंबाची उपजीविका भागवित होते. निवृत्ती आहेर त्यांच्या निम गल्ली येथील घरातून बुधवार (ता. १३)पासून बेपत्ता होते, तशी तक्रार त्यांचे बंधू गोरख आहेर यांनी देवळा पोलिसांत दाखल केली होती. शुक्रवारी (ता. १५) सकाळी अकराच्या सुमारास तहसील कार्यालयातील शिपाई प्रशासकीय इमारतीच्या छतावर पाण्याची टाकी भरली का, हे पाहण्यासाठी गेला असता, त्याला एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याने त्यांनी देवळा पोलिसांना कळविले. मृत व्यक्ती बेपत्ता असलेले निवृत्ती आहेरच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले.
हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?
खिशातल्या सुसाईड नोटमुळे खुलासा
निवृत्ती आहेर यांच्या खिशात कर्जाचा बोजा फेडू शकत नसल्याने आत्महत्या करीत आहोत. आपल्या मृत्यूस कुणासही जबाबदार धरू नये, अशा आशयाची चिठ्ठी आढळली. निवृत्ती आहेर ज्या ठिकाणी मृतावस्थेत आढळले तेथे विषाची बाटलीदेखील आढळली. देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निवृत्ती आहेर यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ, मुलगा असा परिवार आहे. देवळा येथील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा > देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस