ब्रेकिंग! उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांचा राजीनामा; आणखी काय म्हणाले ते, पाहा VIDEO

हर्षल गांगुर्डे
Thursday, 15 October 2020

निवडणूक तोंडावर असतांना माझ्यावर अविश्वास दाखवला जातो, हे धक्कादायक आहे. याबाबतचे उत्तर चांदवडकर येत्या काळात देतील, असे कासलीवाल यांनी राजीनाम्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

नाशिक : (गणुर) गेल्या दोन दिवसांपासून ढवळून निघालेल्या चांदवड नगरपरिषद वातावरण वेगळ्या वळणावर येऊन थांबले आहे. स्वपक्षीय नगरसेवकांनीच भूषण कासलीवाल यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी केल्याने अखेर त्यांनी आज गुरुवारी (ता.15) सायंकाळी नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. 

याचे उत्तर चांदवडकर येत्या काळात देणार...

चांदवड नगरपरिषद निवडणुकीत निवडून आल्यानंतर गेली काही वर्षे शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भूषण कासलीवाल यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका विरोधी गटात जाऊन मिळाल्या. जिल्हाधिकारी यांच्याकडे स्थापन केलेल्या गटातील नगरसेविका इंदूबाई वाघ, सुनीता पवार, जयश्री हांडगे यांनी अविश्वास ठरावाची तयारी केल्याने भूषण कासलीवाल व्यथित झाले होते. इतक्या दिवस भाजपा पक्षाचे सरकार असतांना शहरासाठी विकासनिधी आणणारे कासलीवाल सर्वांना चालले मात्र, निवडणूक तोंडावर असतांना माझ्यावर अविश्वास दाखवला जातो, हे धक्कादायक आहे. याबाबतचे उत्तर चांदवडकर येत्या काळात देतील, असे कासलीवाल यांनी राजीनाम्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

दरम्यान उद्या होणाऱ्या विशेष बैठकीपूर्वीच राजीनामा देऊन भूषण कासलीवाल यांनी विरोधकांच्या खेळीच्या एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा चांदवडमध्ये आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Mayor Bhushan Kasliwal resigns nashik marathi news