esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

bull n horse race.jpg

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असूनदेखील केवळ मनोरंजनासाठी अशाप्रकारचे लाजिरवाणे कृत्य केले. मोठ्या प्रमाणात लोक तेथे जमा झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा लवलेशही तेथे दिसत नव्हता. प्रशासनाला कोणतीही कल्पना व पूर्वसूचना न देता आयोजन केल्याबाबत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

रंगात आला डाव...पण पोलिसांना बघून टांगा पलटी घोडे फरार...अन् मग चांगलीच झाली फजिती!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक/वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असूनदेखील केवळ मनोरंजनासाठी अशाप्रकारचे लाजिरवाणे कृत्य केले. मोठ्या प्रमाणात लोक तेथे जमा झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा लवलेशही तेथे दिसत नव्हता. हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील दगडमाड शिवारात देशात जमावबंदी व लॉकडाउन सुरू असताना तांगा शर्यत भरवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 14 जणांवर गुन्हा दाखल झाला. 

असा आहे प्रकार

हस्तेदुमाला येथील सोनीराम गावित यांच्या मालकीच्या दगडमाळ शिवारात शेत गट क्रमांक 210 मध्ये त्यांची परवानगी न घेता अगर पूर्वसूचना न देता, रामभाऊ गायकवाड, हरिश्‍चंद्र गायकवाड, बाळू राऊत (सर्व रा. हस्तेदुमाला, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी शुक्रवारी (ता. 24) तांगा शर्यती आयोजन केले होते. याबाबत वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी यांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांचे पथक शर्यतीच्या ठिकाणी रवाना केले. शर्यत सुरू असतानाच पोलिस दाखल झाल्याने खेळणाऱ्यांसह प्रेक्षक पळून गेले. या वेळी घटनास्थळी सहा दुचाकी व तीन महिंद्र पिक-अप वाहने पोलिसांनी जप्त केली. तसेच पोलिसांनी दुचाकी घेऊन पळणाऱ्या प्रकाश कडाळे (रा. हस्तेदुमाला), जयराम गवळी (रा. टाक्‍याचा पाडा, ता. दिंडोरी) यांच्यासह पिक-अप सोडून पळून गेलेले तीन पिक-अप मालक यांना ताब्यात घेतले. 

हेही वाचा > संचारबंदीतही 'ते' 'मालेगाव टू सिडको'?...अन् नातेवाईकांनीही दिला आसरा...कारवाई तर होणारच!

सहा दुचाकी सोडून पळून जाणारे अज्ञात सहा असे आयोजकांसह 14 संशयितांविरुद्ध बैल व घोडा यांच्या शर्यती भरवून क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी अनुक्रमे मोहन राऊत (रा. नागईपाडा), पांडुरंग झिरवाळ (रा. खुंटीचा पाडा), रामचंद्र राऊत (रा. चिमणपाडा) तसेच कोरोना विषाणूसंदर्भात महाराष्ट्र शासनाने व पोलिस प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन, जमावबंदी आदी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.  

हेही वाचा > म्हाडाची नवनिर्मित घरे कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणली जातील - जिल्हाधिकारी

go to top