नाशिकमध्ये कालिकामातेच्या ऑनलाईन दर्शनास भाविकांची पसंती 

दत्ता जाधव
Thursday, 22 October 2020

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकोत्सवात मंगळवारी सहाव्या माळेला सकाळी विश्‍वस्तांच्या हस्ते पहाटे आरती झाल्यावर दुपारी महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी आरतीतही मान्यवर सहभागी झाले होते.

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या गुरुवार (ता. २२)च्या सहाव्या माळेला भाविकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शनाला पसंती दिली. महिला भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने कित्येक वर्षांत प्रथमच भाविकांविना सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची रंगत वाढविली. 

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकोत्सवात मंगळवारी सहाव्या माळेला सकाळी विश्‍वस्तांच्या हस्ते पहाटे आरती झाल्यावर दुपारी महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी आरतीतही मान्यवर सहभागी झाले होते. ट्रस्टतर्फे नव्याने उभारण्यात येत असलेल्या भक्तनिवासाचे काम प्रगतिपथावर आहे. या उपक्रमासाठी शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. देवस्थानासाठी ऑनलाइन देणग्यांचे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले असून, त्यालाही चांगला प्रतिसाद असल्याचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी सांगितले. शासकीय आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सातव्या माळेला होणारा घागरी फुंकण्याचा कार्यक्रमही यंदा रद्द करण्यात आलेला आहे. अष्टमीचा होम विधी, कुमारिका पूजन सोहळा होणार असला तरी कोरोनामुळे निवडक विश्‍वस्तांच्या उपस्थितीतच हा विधी होणार असून, त्यासाठी भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees prefer online darshan of Kalikamata in Nashik marathi news