नाशिकमध्ये रणगाडा बसविण्यावरून शिवसेना नगरसेवकांत जुंपली! तिदमे भूमिकेवर ठाम; कल्पना चुंभळेंचा विरोध 

प्रमोद दंडगव्हाळ
Friday, 23 October 2020

प्रभाग २४ मधील लेखानगर येथील चौफुलीवर हा रणगाडा बसवण्याचा मानस शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांचा आहे. तर ही जागा नर्सरीसाठी राखीव असल्याने तेथे रणगाडा बसविणे घटनाबाह्य असल्याचे मत शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना चुंभळे यांनी मांडले आहे.

नाशिक/सिडको : पाकिस्तानच्या युद्धात भारताने वापरलेला रशियन बनावटीचा रणगाडा नाशिक शहरात आल्याने नाशिककरांसाठी अभिमान वाटावी अशी बाब असताना रणगाडा बसविण्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्येच जुंपली आहे. 

प्रभाग २४ मधील लेखानगर येथील चौफुलीवर हा रणगाडा बसवण्याचा मानस शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांचा आहे. तर ही जागा नर्सरीसाठी राखीव असल्याने तेथे रणगाडा बसविणे घटनाबाह्य असल्याचे मत शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना चुंभळे यांनी मांडले आहे. रणगाडा देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याला योग्य स्थान मिळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र रणगाडा त्याच ठिकाणी बसविण्यावर तिदमे ठाम आहेत. त्यामुळे दोन्ही नगरसेवकांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे रणगाडा सध्या एका मोकळ्या मैदानात उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. रणगाडा आणण्यापूर्वी ठिकाण निश्चित करून त्या जागेचे सुशोभीकरण करणे आवश्यक होते असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. युद्धात वापरलेल्या रणगाड्याची शान अबाधित राखली पाहिजे, त्यास योग्य ते स्थान मिळाले पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

रणगाडा देशाचा अभिमान आहे. ज्या ठिकाणी रणगाडा बसवण्याचा हट्टा करण्यात येत आहे ते घटनाबाह्य आहे. याबाबत लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. 
- कल्पना चुंभळे, नगरसेविका, शिवसेना 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

लेखानगर येथील मोकळ्या जागेत रणगाडा बसण्यासाठी ठराव संमत करण्यात आलेला आहे. लवकर त्याचे काम सुरू होईल. 
- प्रवीण तिदमे, नगरसेवक, शिवसेनाㅊ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disagreement among Shiv Sena corporators over the location of the tank nashik marathi news