इगतपुरीच्या पूर्व पट्ट्यात भातपिकावर रोगांचे थैमान 

राम शिंदे
Monday, 12 October 2020

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद-खेड गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह पंधरा ते वीस गावांच्या शिवारातील भातशेतीवर करपा, तुडतुडा, पांढरा, तांबडा टाकाने थैमान घातले आहे.

नाशिक / सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद-खेड गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह पंधरा ते वीस गावांच्या शिवारातील भातशेतीवर करपा, तुडतुडा, पांढरा, तांबडा टाकाने थैमान घातले आहे.

पूर्व पट्ट्यात भातपिकावर रोगांचे थैमान 

शेतीपूरक पाऊस असताना भातशेती जोरात होती. पोटऱ्यात निसवलेल्या भातपिकांवर मधेच करपा, तुडतुडा, पांढरा टाका यांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांची भातपिके उद्ध्वस्त झाली आहेत. प्रशासनाने भातपिकांची पाहणी करावी व करप्या रोगाने उद्ध्वस्त झालेल्या भातपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी टाकेद, अधरवड, खेड, अडसरे येथील सरपंच ज्ञानेश्वर डमाळे, ज्ञानेश्‍वर बऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते उमेश बऱ्हे, पांडुरंग बऱ्हे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी अधिकारी भास्कर गिते, घोटी मंडळाचे कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, कृषी सहाय्यक काळे आदींनी शेतावर प्रत्यक्ष येऊन पाहणी करीत शिवारातील करप्या, तुडतुडा रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजना व औषधांची माहिती दिली.  

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diseases on rice crops Igatpuri nashik marathi news