आता टाळी वाजविताच पोलीसांचं होणार 'सॅनिटायझेशन'...कसं ते वाचा..

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 एप्रिल 2020

पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील लॉनवर हा बोगदा बसविला आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आतमध्ये गेल्यानंतर टाळी वाजविताच एका विशिष्ट कार्यप्रणालीद्वारे यंत्रणा कार्यान्वित होते. त्यानंतर...

नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याविरोधात लढा उभा करण्यासाठी देशभर संचारबंदी लागू आहे. पोलिस रस्त्यावर कोरोनाविरोधात उभे आहेत. या महामारीचा त्यांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. ही बाब हेरून रोहन एनर्जीने एका निर्जंतुकीकरण बोगद्याची निर्मिती केली असून, ते पोलिस आयुक्तालयात बसविले आहे. त्यामुळे घरी जाण्यापूर्वी पोलिसांना स्वत:ला निर्जंतुकीकरण करणे शक्‍य होणार आहे. 

टाळी वाजविताच पोलीसांचं होतयं 'सॅनिटायझेशन'   
गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील लॉनवर हा बोगदा बसविला आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आतमध्ये गेल्यानंतर टाळी वाजविताच एका विशिष्ट कार्यप्रणालीद्वारे यंत्रणा कार्यान्वित होते. त्यानंतर बोगद्याच्या आत असलेल्या व्यक्तीवर सोडियम हायपोक्‍लोराइड द्रावणाचा फवारा काही सेकंद होतो. या फवाऱ्याच्या सान्निध्यात येणारी व्यक्ती किंवा वस्तू निर्जंतुक होते. आपल्या जिवाची पर्वा न करता पोलिस लॉकडाउनसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना सुरक्षेचे साधन उपलब्ध करण्यासाठी रोहन एनर्जीच्या सहकऱ्यांनी या प्रकल्पाची निर्मिती केली आहे, असे रोहन एनर्जीचे संचालक एस. एस. सांगळे यांनी सांगितले. या वेळी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पार्थ भट्टाचार्य, कपिल दुर्वे, हेमंत सांगळे, भांड उपस्थित होते. 

हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच  

हेही वाचा > कर्जाच्या बोजाखाली 'त्याचा' जीव गुदमरला..अखेर तरुण शेतकऱ्याने शेवटचा निर्णय घेतला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disinfection system at the Police Commissioner quarter at nashik marathi news