VIDEO : महापौरांचा दौरा अन् हाय व्होल्टेज ड्रामा! नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार हातापायी अन् शिवीगाळ; वातावरण तापले

प्रमोद दंडगव्हाळ
Friday, 21 August 2020

महापौरांचा दौरा अन् हाय व्होल्टेज ड्रामा..नागरिकांचे प्रश्न तर बाजूलाच राहिले. उलट येथे असा प्रकार घडला ज्याने काही काळ वातावरण तापले होते. अशा निंदनीय प्रकारामुळे इथले नागरिक प्रचंड तणावाखाली आहेत. 

नाशिक / सिडको : महापौरांचा दौरा अन् हाय व्होल्टेज ड्रामा..नागरिकांचे प्रश्न तर बाजूलाच राहिले. उलट येथे असा प्रकार घडला ज्याने काही काळ वातावरण तापले होते. अशा निंदनीय प्रकारामुळे इथले नागरिक प्रचंड तणावाखाली आहेत. 

काय घडले नेमके?

सिडकोच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये शुक्रवारी सकाळी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी  महापौर सतीश कुलकर्णी आले होते. पण त्यावेळी असे काही घडले ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. महापौरांसमोरच शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे व स्थानिक नागरिक सुधाकर जाधव यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची व शिवीगाळ झाल्याने काही काळ येथील वातावरण तापले होते. त्यानंतर पुढे....

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

प्रकार हातापायीवर आल्याने महापौरांचा काढता पाय

हा प्रकार अगदी हातापायीवर आल्याने महापौरांनी येथून काढता पाय घेतला. तसेच नागरिकांचे प्रश्न बाजूलाच उलट दौरा अर्धवट सोडावा लागल्याची नामुष्की त्यांच्यावर आली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक मधुकर जाधव, नगरसेविका अलका आहिरे, नगरसेविका हर्षदा गायकर, भाजप पदाधिकारी कैलास आहिरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

अदखलपात्र गुन्हा दाखल

यासंदर्भात नगरसेवक भागवत आरोटे व स्थानिक नागरिक सुधाकर जाधव यांच्यावर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

रिपोर्ट - प्रमोद दंडदव्हाळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between corporators and citizens nashik marathi news