राज्यात जुलैचे आतापर्यंत 16 लाख 32 हजार 420 क्विंटल अन्नधान्य वाटप - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत प्रत्येक लाभार्थ्याला महिन्याला 5 किलो (गहू अथवा तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे. जुलैच्या मध्यापर्यंत 9 हजार 656 रेशनकार्डला मोफत गहू, तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 41 हजार 704 लोकसंख्येला 2 हजार 90 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे.

नाशिक : राज्यातील 52 हजार 431 रेशन दुकानांमधून 15 जुलैपर्यंत राज्यातील 84 लाख 36 हजार 596 शिधापत्रिकाधारकांना 16 लाख 32 हजार 420 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न-नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य

श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या योजनेमधून सुमारे 9 लाख 21 हजार 806 क्विंटल गहू, 7 लाख 8 हजार 528 क्विंटल तांदूळ, तर 9 हजार 485 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले, परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 1 लाख 87 हजार 202 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी सरकारच्या पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. 6 जूनपासून आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 61 हजार 917 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 6 कोटी 31 लाख 47 हजार 73 लोकसंख्येला 31 लाख 57 हजार 350 क्विंटल तांदळाचे वाटप झाले. 

सवलतीत धान्याचे वाटप 

राज्य सरकारने कोरोना संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 ए.पी.एल. केसरी शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये किलो व तांदूळ 12 रुपये किलो) देण्याचा निर्णय घेतला. या धान्याचे मे व जूनसाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रत्येक रेशनकार्डला 1 किलो मोफत डाळ (तूर अथवा हरभराडाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत योजनेतून 3 लाख 71 हजार 159 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जूनसाठी वितरण झाले. आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जूनसाठी असून त्यातंर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 5 किलो मोफत तांदूळ दिला जात आहे. आतापर्यंत 1 लाख 28 हजार 699 क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

14 लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वाटप
 
राज्यात 1 ते 15 जुलैपर्यंत 869 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये थाळीप्रमाणे 14 लाख 78 हजार 748 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात गरीब व गरजूंना एप्रिलमध्ये 24 लाख 99 हजार 257, मेमध्ये 33 लाख 84 हजार 040, तर जूनमध्ये 30 लाख 96 हजार 232 थाळ्यांचे वाटप झाले. जुलैमध्ये आतापर्यंत 14 लाख 78 हजार 748 आणि 1 एप्रिल ते 15 जुलैपर्यंत 1 कोटी 4 लाख 58 हजार 277 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत. 

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of 16 lakh 32 thousand 420 quintals of foodgrains in the state till July - Chhagan Bhujbal nashik marathi news